समाज कल्याण वसतीगृहातील विद्यार्थीनींच्या जेवणात आळ्या

नांदेड : पोलीसनामा आॅनलाईन

माधव मेकेवाड

 

समाज कल्याण वसतीगृहातील विद्यार्थीनींच्या जेवणात आळ्या निघाल्याची धक्कादायक घटना नांदेड येथे घडली आहे. याप्रकरणी विद्यार्थीनींनी समाज कल्याण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र अधिकाऱ्यांकडून विद्यार्थीनींची चेष्टा करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1ec5b0bc-c49a-11e8-ad9d-414742268d73′]

शैक्षणिक वर्ष होऊन चार महिने झाले तरी वसतिगृहातील मुलींला जेवणात मूठभर भात व दोन पोळ्या देत आहेत.

याशिवाय पोह्यात उंदराच्या लेंडया, भांडी घासणीचे तार, जेवणात कधी गोम तर कधी फळे व भातात अळ्या, फिल्टर चे अशुद्ध पाणी मिळत आहे. अशा प्रकारचे अनेक प्रश्न घेऊन वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी समाज कल्याण चे वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे तक्रार केली आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2638bc2b-c49a-11e8-b80f-a3cc66cd05bd’]

यावेळी एकून ६५ विद्यार्थीनींनी सामाजिक न्याय भवणाकडे धाव घेतली. परंतु तिथे त्यांची चेष्टा करण्यात करण्यात आली. त्यामुळे  मुलींची मने दुखावली गेली आहेत. समाज कल्याण अधिकारी कार्यालयात नव्हते म्हणून मुली कार्यालया खाली येऊन बसल्या.

काही वेळाने सहाय्यक आयुक्त आल्यानंतर मुलींनी त्यांना सर्व प्रकार सांगितला. मात्र, त्यांनी मुलींना जेवणा पासून ते मोबाईल वापरण्यापर्यंत अनेक बंधने घालण्यात आली. दरम्यान मुलींना अनेक समस्यांशी सामना करावा लागत आहे.

कॉम्प्युटर इंजिनीअर कडून वाहतूक पोलिसांना मारहाण 

त्या वस्तीगृहाचा अतिरिक्त चार्ज वरिष्ठ लिपिक सोनकांबळे यांच्या कडे असून त्यांनी मुलींकडून जबरदस्तीने बॉण्ड पेपर लिहून घेऊन मोबाईल जप्त केले आहेत. असे या वेळी विद्यार्थीनींनी सांगीतले.

[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3c5d11b2-c49a-11e8-a1b2-8bdfebb6f60f’]

मुलींनी अधिकाऱ्यांला सांगितले की, आम्हाला जेवणात लिंबा एवढा भात व दोन पोळी मिळते, इमारत जुनी असल्याने स्लॅपचे पाणी जेवणाच्या ताटात पडते,अभ्यासाची वेगळी सुविधा नाही. अशा अनेक अडचणी सामना करत मुली आपले शिक्षण पूर्ण करत आहेत.

जाहिरात