Bad Habits For Ear Health | ‘या’ 4 सवयींमुळे तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो परिणाम; ‘या’ पध्दतीच्या चूका करण्यासाठी राहा दूर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Bad Habits For Ear Health | कानांची समस्या (Ear Problems), विशेषत: ऐकू न येणे ही वाढत्या वयानुसार निर्माण होणारी समस्या मानली जात असली, तरी गेल्या काही वर्षांत तरुणांमध्येही ही समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. राहणीमानातील बिघाडामुळे तुमच्यात मधुमेह आणि हृदयरोगासारख्या समस्या तर वाढतातच, शिवाय बहिरेपणाचा त्रास (Deafness Problem) होतो. कान निरोगी ठेवण्यासाठी आणि श्रवणशक्ती टिकवून ठेवण्यासाठी जीवनशैलीच्या सवयींबरोबरच आहार व्यवस्थित ठेवणे अत्यंत आवश्यक ठरते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे (Bad Habits For Ear Health).

 

आपण अनेक गोष्टी कळत-नकळत रोज करत राहतो, ज्याचा आपल्या कानाच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञ या सवयी टाळण्याचा सल्ला देतात. अशाच काही चुकीच्या सवयींबद्दल पुढे जाणून घेऊया (Bad Habits For Ear Health).

 

हेडफोनने कानांना नुकसान (Headphones Damage Ears) :
जास्त आवाजात किंवा मोठ्या आवाजात गाणी ऐकणे हे बहिरेपणाचे सर्वात सामान्य आणि प्रमुख कारणांपैकी एक मानले जाते. मोठ्या आवाजात संगीत ऐकणे, हेडफोन-इअरफोनचा आवाज बर्‍यापैकी जास्त ठेवल्यास कानांना गंभीर इजा होऊ शकते. हेडफोन-इअरफोनमुळे गेल्या काही वर्षांत ही समस्या खूपच वेगाने वाढताना दिसत आहे. मोठ्या आवाजामुळे कानाच्या पडद्यावर अधिक दाब पडतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांचा धोका संभवतो.

नियमित व्यायाम (Regular Exercise) :
व्यायामाच्या अभावामुळेसंपूर्ण शरीराची क्षमता खराब होते, कानांना देखील यामुळे इजा होण्याचा धोका संभवतो. व्यायामाच्या अभावामुळे मधुमेह आणि रक्ताभिसरणाच्या समस्याही वाढतात, ज्यामुळे कानाच्या समस्या वाढण्याचाही धोका संभवतो.

 

संशोधनात असे सूचित केले गेले आहे की ज्या लोकांना आहाराची कमतरता आहे आणि अधिक सुखासीन जीवनशैली आहे त्यांचा रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो, ज्याचा कानांच्या क्षमतेवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

 

दुर्लक्ष करू नका (Don’t Ignore) :
कान शरीराच्या सर्वात संवेदनशील अवयवांपैकी एक आहे, म्हणून त्यांच्यात उद्भवणार्‍या कोणत्याही प्रकारच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. कान दुखणे किंवा आवाज येणे यासारख्या अंतर्गत समस्या असू शकतात, त्याकडे गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. या सुरुवातीच्या लक्षणांवर वेळीच उपचार झाले तर बहिरेपणाचा धोका बर्‍याच अंशी कमी होऊ शकतो.

 

धूम्रपानाने कानांना नुकसान (Ear Damage Due To Smoking) :
धूम्रपानाची सवय सामान्यत: फुफ्फुस आणि हृदयासाठी गंभीर मानली जाते, परंतु संशोधनातून असे आढळून आले आहे
की, यामुळे कानाच्या समस्या देखील वेगाने वाढू शकतात. सिगारेटच्या धुरात असलेली रसायने आपल्या कानातील मज्जातंतू आणि पेशींवर परिणाम करू शकतात,
परिणामी ऐकण्याची क्षमता कमी होते. तरुण वयात वाढत्या बहिरेपणाच्या समस्येसाठी ही सवय एक प्रमुख घटक समजली जाते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Bad Habits For Ear Health | bad habits for ear health how earphones and smoking affect hearing

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

High And Low Blood Pressure Symptoms | जाणून घ्या उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाबाच्या लक्षणांमधील फरक

 

Benefits Of Walnuts | उन्हाळ्याच्या दिवसात ड्रायफ्रुट खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे; जाणून घ्या सविस्तर

 

Health Tips | रिकाम्या पोटी ‘चहा’ पिता का?; चांगलं की वाईट? जाणून घ्या सविस्तर