क्रुरकृत्य ! गर्भामध्ये ‘मुलगा’ आहे की ‘मुलगी’ माहिती करून घेण्यासाठी 5 मुलीच्या बापानं पत्नीचं पोट ‘ब्लेड’नं कापलं

नवी दिल्ली. वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका माथेफिरू वडिलांनी मुलाच्या हव्यासापोटी आपल्या गर्भवती पत्नीचे पोट फाडले. घरात उपस्थित मुलींची ओरड ऐकून स्थानिक लोक पळत आले आणि पतीची राक्षसी वृत्ती पाहून ते स्तब्ध झाले. ग्रामस्थांनी घाईघाईने पीडितेला जिल्हा रूग्णालयात दाखल केले जेथे तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

5 मुलींचा बाप आहे तरुण

या तरुणाला आधीच 5 मुली असून त्याची पत्नी पुन्हा गरोदर आहे. तरुणाला शंका होती की पत्नीच्या पोटात असणारं मूल देखील एक मुलगी तर नसावी. त्यामुळे गर्भाशयात मुलगी आहे की मुलगा हे जाणून घेण्यासाठी त्या तरूणाने आपल्या पत्नीचे ब्लेडने पोट फाडले. असह्य वेदनेने बायकोचा आवाज ऐकून घरात असलेल्या मुली आरडाओरडा करू लागल्या, तेव्हा स्थानिकांनी रडण्याचे कारण विचारले. मुलींनी वडिलांचे कृत्य सांगितल्यावर गावकरी घरात शिरले आणि तेथील दृश्य पाहून स्तब्ध झाले. ग्रामस्थांनी घाईघाईने पीडितेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून डॉक्टरांनी तिला बरेली येथे रेफर केले. प्राप्त माहितीनुसार महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.

पाशवी वृत्तीच्या पतीला अटक

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी तरुणास अटक केली. बदायूंच्या एसएसपीने आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याचे सांगितले.

आरोपीविरोधात व्हावी कडक कारवाई: रेखा शर्मा

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की आजही आपल्या समाजात मुलींचे नाही तर मुलाचे जास्त अस्तित्व आहे, हे विचार संपवणे काळाची गरज आहे. समाजात पुन्हा असा क्रूर प्रकार समोर येऊ नये म्हणून मी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like