UP : ‘L&O’ चे धिंडवडे ! पोलीस अधिकाऱ्यास गोळी झाडून सराईतांनी म्होरक्यास केलं ‘आझाद’

मुज्जफरनगर(उत्तरप्रदेश) : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेश मधील मुज्जफरनगरमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेविषयी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. येथील कोर्टाच्या एका सुनावणीहून परतत असताना काही गुन्हेगारांनी पोलीस अधिकाऱ्याला गोळी मारून एका कुख्यात आरोपीची सुटका केली आणि फरार झाले. या घटनेने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. जखमी अधिकाऱ्याला तात्काळ दवाखान्यात दाखल केले आहे. पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.

जाणसठ कोतवाली क्षेत्रातील सलारपुर गावाजवळ पांढऱ्या रंगाच्या वेरणा कारमधून आलेल्या गुन्हेगारांनी पोलिसांवर हल्ला करून मंसूरपूर येथील कुख्यात आणि सराईत आरोपी रोहित उर्फ सांडू याला पोलिसांच्या ताब्यातून सोडवले आणि फरार झाले. यावेळी पोलिसांनी विरोध केला असता याला गुन्हेगारांनी गोळीबार केला. या गोळीबारात मिर्झापूरचे पोलीस अधिकारी दुर्ग विजय सिंह जखमी झाले. त्याचबरोबर गुन्हेगारांनी याठिकाणी मिरची पावडरचा वापर देखील पोलिसांवर केला.

अशी घडली घटना :

सराईत गुन्हेगार आणि आरोपी रोहित अनेक प्रकारच्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात होता. मंगळवारी एका खटल्यासंदर्भात त्याला कोर्टात सादर करण्यासाठी मिर्झापूर पोलीस घेऊन आले होते. कोर्टातील कामकाज आटोपून दुपारी अडीचच्या दरम्यान माघारी जाताना पोलीस जाणसठ जवळ सालारपूर येथे हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले असता ५ गुन्हेगारांनी त्यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. गुन्हेगारांनी आधी पोलिसांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि मग गोळीबार करत आरोपी रोहितला घेऊन फरार झाले.

यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व रस्त्यांवर नाकेबंदी केली आणि गुन्हेगारांची शोधाशोध सुरु केली. तसेच जखमी पोलीस अधिकाऱ्याला जवळच्या दवाखान्यात दाखल केले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी ‘हा’ फेसपॅक लावा ; जाणून घ्या प्रोसेस

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

‘महावितरण’कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा