पोलीसनामा ऑनलाइन टीम – Bael Juice Benefit In Summer | उन्हाळ्यात बेलाचा ज्यूस (Bael Juice) खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने तुम्हाला उष्णता जाणवणार नाही. तसेच उष्णतेपासून वाचण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. यासोबतच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून ते रक्त साफ करण्यासाठी बेलाचा ज्यूस खूप उपयुक्त आहे (Bael Juice Benefit In Summer). याशिवाय बेल ज्यूस पिण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेवूयात (Know The Benefits Of Drinking Bael Juice)…
इम्यूनिटी होईल मजबूत (Immunity Will Be Stronger)
जर तुम्ही उन्हाळ्यात बेलाचा ज्यूस प्यायला तर तुमची इम्युनिटी मजबूत होईल. चांगली इम्युनिटी शरीराला रोगांशी लढण्यास सक्षम करते. प्रोटीन, बीटा-कॅरोटीन, थायामिन, रिबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन सी सारखी पोषक तत्वे बेलाच्या ज्यूसमध्ये आढळतात.
रक्त होईल शुद्ध (Blood Will Be Pure)
बेलाचा ज्यूस रक्त स्वच्छ करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. जरी रक्त स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रकारची औषधे देखील उपलब्ध असली तरी बेलाचा ज्यूस हा एक नैसर्गिक पर्याय आहे, जो तुम्ही अवलंबू शकता (Bael Juice Benefit In Summer).
हृदयरोगात फायदेशीर (Beneficial In Heart Disease)
याशिवाय बेलाच्या ज्यूसमध्ये तूप मिसळून काही प्रमाणात सेवन केल्यास त्याचा फायदा दिसून येतो. यामुळे हृदयाचे आजार दूर राहतात. म्हणजेच हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
महिलांसाठीही फायदेशीर (Beneficial For Women)
बेलाच्या ज्यूसचे सेवन महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. हा ज्यूस स्तनाच्या कर्करोगापासून संरक्षण करतो.
यासोबतच स्तनपान करणार्या महिलांसाठीही बेल ज्यूस उपयुक्त आहे (Women Health). त्याच्या सेवनाने आईच्या दुधाचे उत्पादन वाढते.
कधी प्यावा बेल ज्यूस, जाणून घ्या (Know When To Drink Bael Juice)
तुम्ही सकाळी किंवा दुपारी रिकाम्या पोटी बेल ज्यूस पिऊ शकता, परंतु लक्षात ठेवा की खाल्ल्यानंतर किंवा
चहा-कॉफीनंतर लगेच बेल ज्यूस पिऊ नये. कारण असे केल्याने फायद्याऐवजी तोटे होऊ शकतात.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Bael Juice Benefit In Summer | bael juice benefit heart remain fit cholesterol diabetes heat will remain away
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
High BP | हाय बीपीच्या रुग्णांच्या आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करावा, जाणून घ्या