लव्ह जिहाद : नर्सचा आरोप – अकरम कुरैशीने ‘अक्षय’ बनून केली मैत्री; 7 महिन्यांपर्यंत ठेवले शारीरिक संबंध

बागपत : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये एका खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरवर नर्सने लव्ह जिहादचा आरोप केला आहे. मुस्लिम डॉक्टरने ओळख लपवून हिंदू नर्सला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि 7 महिन्यांपर्यंत तिचे शारीरिक शोषण केले. जेव्हा नर्स प्रेग्नंट झाली, तेव्हा डॉक्टरने तिच्या समोर धर्म परिवर्तनाची अट ठेवून लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पीडितेने यास नकार दिला. आता तिने पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी एएसपी (बागपत) मनीष मिश्रा यांनी सांगितले की, डॉक्टरची पहिली पत्नी आणि त्याच्या भावाला अटक केली आहे. मुख्य आरोपी डॉक्टर फरार आहे.

ही नर्स सहा महिन्यांची गरोदर आहे. बुधवारी तिने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पीडितेचा आरोप – ओलिस ठेवून छळ केला
पीडितेचा आरोप आहे की, डॉक्टरने तिला ओलिस ठेवून छळ केला. आरोपी डॉक्टर विवाहित आहे आणि त्याला दोन मुले आहेत. पीडित नर्स खेकडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी आहे. ती बडौतच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्सच्या पदावर कार्यरत आहे.

अश्लील व्हिडिओसुद्धा बनवला
नर्सचा आरोप आहे की, हॉस्पिटलमध्ये कार्यरत एक मुस्लिम डॉक्टर अकरम कुरैशीने आपले नाव अक्षय सांगून तिच्याशी मैत्री केली होती. डॉक्टरने स्वत: घटस्फोटीत असल्याचे सांगून तिच्यासोबत लग्न करण्याबाबत विचारले. मागील 7 महिन्यांपासून तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. आरोपीने तरुणीचा अश्लील व्हिडिओसुद्धा बनवला होता. जेव्हा ती लग्नाबाबत बोलायची तेव्हा डॉक्टर तो अश्लील व्हिडिओ दाखवून तिचे तोंड बंद करत होता.

आरोपी डॉक्टरच्या पत्नीवर मारहाणीचा आरोप
दरम्यान, तरुणी प्रेग्नंट झाल्यानंतर डॉक्टरने तिला मूल पाडण्यासाठी दबाव आणला. गर्भपात करण्यास नकार दिल्याने तिला मारहाण करण्यात आली. सोबतच धर्म परिवर्तनासाठीसुद्धा दबाव आणला गेला. पीडितेने आरोपी डॉक्टरच्या पत्नीवरसुद्धा मारहाणीचा आरोप केला आहे. मंगळवारी जेव्हा नर्स डॉक्टरच्या घरी गेली, तेव्हा त्याची पत्नी आणि भावाने तिला मारहाण केली. तिच्या पोटावर लाथ मारली आणि गर्भपात करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिची प्रकृती बिघडली. तिने कशीतरी आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि पोलिसांकडे येऊन तक्रार केली. पीडितेने एसपी बागपत यांना लेखी तक्रार देत कारवाईची विनंती केली आहे.