UP : प्रियकराशी लग्न करण्यासाठी आई-वडीलांनाबनवलं गुन्हेगार, म्हणाली – ‘मला 5 लाखात विकतायेत’

बागपत : पोलीसनामा ऑनलाइन  –  उत्तर प्रदेशच्या बागपतमधून हैराण करणारा प्रकार समोर आला आहे, येथे एका मुलीने आपला एक व्हिडिओ वायरल करून खळबळ उडवून दिली. त्या व्हिडिओत मुलीने म्हटले की, तिचे आई-वडील तिची विक्री करणार आहेत आणि त्यांनी तिला ओलिस ठेवले आहे. व्हिडिओ वायरल करून मुलीने जो आरोप केला होता, तो खरोखरच धक्कादायक होता. हा व्हिडिओ एका सामाजिक संस्थेकडे पोहचला, ज्यानंतर बागपत पोलिसांच्या मदतीने संस्थेचे लोक वायरल व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पत्त्यावर पोहचले आणि मुलीला ताब्यात घेतले गेले. परंतु, जेव्हा पोलिसांच्या चौकशीत गुपित उघड झाले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

हे प्रकरण मेरठ जनपदशी संबंधीत आहे. येथे टीपी नगर परिसरात राहणार्‍या एका तरूणीेने सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून अपलोड केला. त्या व्हिडिओत तिने आपल्या आई-वडीलांवर आरोप केला की, घरच्यांनी तिला अनेक महिन्यांपासून ओलिस ठेवले आहे. या लोकांनी तिचा सौदा हरियाणाच्या एका व्यक्तीशी 5 लाख रूपयात केला आहे आणि लवकरच तिला विकणार आहेत.

व्हिडिओ वायरल झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. हा व्हिडिओ एका सामाजिक संस्थेकडे पोहचल्यानंतर त्यांनी मुलीचे आरोप गंभीर असल्याचे पाहून मुलीबाबत माहिती घेतली. चौकशी केल्यानंतर समजले की, मुलीला बागपतच्या मितली गावात एका नातेवाईकाच्या घरी ठेवले आहे. यानंतर संस्थेच्या टीमने बागपत पोलिसांशी संपर्क साधला आणि महिला महिला कॉन्स्टेबलसोबत मुलीच्या आत्याच्या घरी सर्वजण पोहचले. जेथून पोलिसांनी मुलीला आपल्या ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले.

जेव्हा पोलिसांनी मुलीची चौकशी केली, तेव्हा त्यांना धक्का बसला. एसपी बागपत यांच्यानुसार, पोलीस चौकशीत मुलीने सांगितले की, तिला आपल्या प्रियकराशी लग्न करायचे होते, परंतु तिच्या घरचे लोक तयार नव्हते. तिच्या जिद्दीमुळे तिला तिच्या आत्याकडे मितली येथे पाठवण्यात आले होते.

मुलीचे म्हणणे आहे की, तिला आपल्या प्रियकरासोबत लग्न करायचे आहे, यामुळे तिने हा खोटा व्हिडिओ बनवून वायरल केला. मात्र, पोलिसांनी तरूणीच्या घरच्यांनाही सूचना दिली आहे आणि त्यांच्याशी बोलून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. एसपी बागपत प्रताप गोपेन्द्र यांचे म्हणणे आहे की, मुलीने आपल्या आई-वडीलांवर जे आरोप केले ते खोटे होते. प्रकरणाची नोंद केली असून तपास सुरू आहे.