‘या’ TV अ‍ॅक्ट्रेसचा ‘फॅट टू फिट’ लुक सोशलवर ‘चर्चेत’ ! वेब सीरीजसाठी घटवलं 13 किलो वजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस वाहबिज दोराबजी आपल्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. तिने तब्बल 13 किलो वजन कमी केलं आहे. सध्या तिचा फॅट टू फिट लुक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

वाहबिजने वेब सीरीजमधील आपल्या रोलसाठी आपलं वजन कमी केलं आहे. सध्या वाहबिज हेल्दी डाएट फॉलो करत आहे. तिने आपल्या हेल्दी लाईफ स्टाईलवर भाष्य केलं आहे.

वाहबिज म्हणाली, “मी नेहमीच फिट लाईफ स्टाईल मेंटेन करत आले आहे. त्यामुळे वर्कआऊट करणं माझ्या दैनंदिन जीवनाचा हिस्सा आहे. आता मी तुकड्या तुकड्यात जेवण घेण्यास सुरुवात केली आहे. योगा, नियमित फिरयला जाणं, हे माझ्या दिनक्रमात समाविष्ट आहे.”

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like