बहुजन हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना विचारला ‘जाब’

पुणे (पुरंदर) : पोलीसनामा ऑनलाईन – पूरग्रस्त भागात प्रतिनियुक्तीवर काही दिवसांसाठी कामावर पाठविण्यात आलेल्या पुरंदरच्या गटविकास अधिकार्‍याने परत कामावर आल्यानंतर स्वतःच्या पंचायत समितीमधील कार्यालयाची गोमूत्र शिंपडून साफसफाई करून पवित्र केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आल्या नंतर बहुजन हक्क परिषदेच्या वतीने आज पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. त्यानंतर झालेली घटना ही गटविकास अधिकाऱ्यांनी मान्य करीत सदरच्या घटनेची माफी मागण्याचा प्रयत्न केला. परंतु बहुजन हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची मागणी फेटाळून लावत गटविकास अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची पुरंदर तालुक्यातून बदली करून त्यांचे खातेनिहाय चौकशी व पदोन्नती थांबवावी अशी मागणी सभापती रमेश जाधव यांच्याकडे बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील धिवार यांनी केली व ती मागणी सभापतींनी मान्य केली.
Purandar
पुरंदर पंचायत समिती ही शिवसेनेच्या ताब्यात असून सध्या शिवसेनेचे सभापती रमेश जाधव व उपसभापती दत्ता काळे हे आहेत. यांचे अधिकाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे यावरून सिद्ध होते.
या प्रकाराने पुरंदर मध्ये खळबळ उडाली असून, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरुंगे, पंचायत समिती सदस्य सुनिता कोलते, सोनाली यादव या सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. पूरग्रस्त सांगली, कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी-अभियंते यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामासाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये पुरंदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांना पाठवण्यात आले होते. त्या परिस्थितीत पदभार अतिरिक्त गटविकास अधिकारी मिंलिद मोरे यांच्या कडे देण्यात आला होता.

दरम्यान, या प्रकरणाची जिल्हा परिषद प्रशासनाकडे गटविकास अधिकारी यांचे निलंबन त्यांची तात्काळ बदली करून खातेनिहाय चौकशी व पदोन्नती थांबवण्यासंदर्भात लेखी तक्रार सभापती रमेश जाधव हे करणार आहेत.

यावेळी बहुजन हक्क परिषदेचे युवक अध्यक्ष संतोष दादा डुबल नितीन होले, भाऊ खोमणे, कैलास धिवार, रामदास कदम, परविन पानसरे, प्रवीण भोंडे, महादेव भोंडे, विशाल लोंढे, सुरज भोंडे, सोपान भोंडे, गणेश भोंडे, गणेश रणपिसे, राहुल कांबळे, कृष्णा फुलवरे, किरण भोंडे, कुणाल भोंडे, संदेश सोनवणे, सचिन खरात, संदीप लोंढे, मंगेश गायकवाड, आदी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –