परभणी : बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलनाचे आयोजन

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी येथे तहसील कार्यालयासमोर (04 मार्च) रोजी एनआरसी, सीएए, एनपीआर, कायद्याविरुद्ध बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन केले जाणार आहे.

पाथरी येथे आयोजित ‘धरणे प्रदर्शन आंदोलनात’ एनआरसी, सीएए, एनपीआर बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

महिला विरुद्ध सततचे वाढत असलेले गुन्हे, इव्हीएम यांसह अनेक मुद्यांवर धरणे आंदोलन केले जाणार आहे. बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समिती पाथरी कडून बुधवार, 04/मार्च रोजी आयोजित धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.