विधानसभा 2019 : वंचित बहुजन आघाडी लातूर जिल्हयातील सर्व जागा लढवणार

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर जिल्ह्यातील सहा ही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यात येणार असल्याची माहिती. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ . अरविंद भातांब्रे यानी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. वंचित बहुजन आघाडीचे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेला भारिप बहुजन महासंघाचे.
जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी. आघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजा मणियार.

औसा मतदार संघाचे उमेदवार. प्रा. सुधीर पोतदार. ॲड . जितेंद्र सातपुते. इस्माईल फुलारी यांची प्रमुख उपस्थिती होती. वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे.आशे डॉ. अरविंद भातांब्रे म्हणाले समाजामध्ये मोठ्या संख्येने असणार्‍या बहुजन समाजाला आत्तापर्यंत विकासापासून दूर ठेवण्याचे काम प्रस्थापिता कडून करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड . प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली केले जात आहे.

यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. भातांब्रे म्हणाले आम्ही कुठल्याही व्यक्तिगत मुद्द्यावर नव्हे तर जनतेच्या प्रश्नावर निवडणूक लढणार आसलयाचे ठामपणे सांगितले.

Visit : Policenama.com