‘गोध्रा’नंतर उसळलेल्या दंगलीतील 17 दोषींना सुप्रीम कोर्टानं दिला जामीन, मात्र गुजरातमध्ये जाण्यास ‘बॅन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : गुजरातमधील २००२ मध्ये गोधरानंतर झालेल्या दंगलींशी संबंधित 17 दोषींना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने सर्व 17 दोषींना जामीन मंजूर केला असून, सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाने निर्णयात म्हंटले कि, दोषींपैकी कोणीही गुजरातच्या सीमेमध्ये प्रवेश करू शकत नाही, तसेच त्यांच्या अपीलबाबत सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय घेईपर्यंत ते इंदौर आणि जबलपूरमध्येच राहतील. कोर्टाने ठरविलेल्या इतर अटींमध्ये समाजसेवेचा समावेश आहे.

दोषींचे वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभाजन :
कोर्टाने दोषींना दोन स्वतंत्र तुकड्यांमध्ये ठेवले आहे. एक तुकडी इंदौर आणि एक तुकडी जबलपूर येथे पाठविण्यात आली आहे. जामिनावर असताना ते सामाजिक कार्य आणि धार्मिक कार्य करतील असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व दोषींना दिले असून तेथील कायदेशीर अधिकाऱ्यांनाही याबाबत सूचना दिल्या आहेत. कोर्टाने यासंबंधी राज्य विधी सेवा प्राधिकरणाला अनुपालन अहवाल देण्यास सांगितले आहे. गोधरा नंतर या दंगलीत 33 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

फेसबुक पेज लाईक करा