‘हमारा बजाज’ परतणार नवे रूप घेऊन ; लवकरच येणार ई-बाईक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कधी काळी ‘हमारा बजाज’ म्हणत बजाज कंपनीच्या स्कुटरने ग्राहकांच्या मनामनात स्थान निर्माण केले होते. मात्र कालांतराने बजाजने बाजारातून ‘निवृत्ती’ स्वीकारली. आता बजाज पुन्हा एकदा एका नव्या रूपात उपलब्ध होणार आहे.  नव्या रुपातील बजाज स्कूटर ही इलेक्ट्रीक स्कूटर असून तिची चाचणी सुरू आहे. सध्या बजाज अर्बनाइटची चाचणी सुरू असून अनेकदा रस्त्यावर ही स्कूटर धावताना दिसली आहे. या स्कूटरच्या चाचणी दरम्यानचे व्हिडिओ आणि फोटो लीक झाले आहेत.

काय आहेत वैशिष्ट्ये

–बजाजची ही नवी इलेक्ट्रीक स्कूटर बजाज ऑटोच्या बजाज अर्बनाइटच्या माध्यमातून बाजारात लाँच होणार आहे.
–या इलेक्ट्रीक स्कूटरची डिझाइन जुन्या स्कूटरसारखी असणार आहे.
–रेट्रो आणि मॉडर्न लूकमधील बॅलन्स साधण्यासाठी स्कूटरमध्ये अलॉय व्हिल्ज, फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक आणि एलईडी हेडलॅम्प व टेल लाइट असू शकते.
–चांगल्या सुरक्षितेसाठी इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम असणार.
–त्याशिवाय डिजीटल इन्स्ट्रूमेंट पॅनल असू शकतो. ज्यामध्ये बॅटरी रेंज, ओडोमीटर आणि ट्रिपमीटरची माहिती उपलब्ध असेल.
–स्मार्टफोन आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसाठी इन्स्ट्रूमेंट पॅनल ब्लूटूथ कनेक्टिव्हीटीला सपोर्ट करेल.

बजाज ऑटो कंपनीने भारतात बजाज स्कूटरद्वारे आपला प्रवास सुरू केला होता. त्यानंतर कालांतराने बजाजने बाजारपेठेतील मागणी आणि गरज लक्षात घेऊन स्कूटरऐवजी मोटरबाइकचे उत्पादन आणि विक्री सुरू ठेवली होती. आता बजाज पु्न्हा स्कूटर लाँच करत आहे.