‘बजाज चेतक’बाबत मोठी बातमी ! जाणून घ्या ‘बुकिंग’ कधीपासुन सुरू आणि किती असेल ‘किंमत’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंथा – 16 ऑक्टोबर 2019 रोजी बजाजने आपली चेतक स्कुटर बाजारात रिलॉन्च केली. या इलेक्ट्रिक स्कुटरबाबत लोक चांगलाच रस दाखवत आहेत आणि याबाबतच्या बुकिंग बाबत विचारणा करत आहेत.

जानेवारी पासून सुरु होणार बुकिंग
मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने बजाज चेतकच्या इलेक्ट्रिक स्कूटरची जानेवारी 2020 पासून बुकिंग सुरु करणार आहे आणि किमतीची देखील घोषणा केली जाणार आहे. चेतक इलेक्ट्रिक यात्रा पूर्ण झाल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. पुण्यातच ही यात्रा पूर्ण झाली. भारताच्या केटीएम शोरूममध्ये चेतकची विक्री केली जाणार आहे. चेतकची विक्री सर्वात आधी पुणे आणि बँगलोर मधून सुरु होणार आहे.

घरीच करू शकता चार्जिंग
चेतक इलेक्ट्रिकला इथेनिअम बॅटरी दिली जाणार आहे ज्यामुळे घरीच 5-15 amp मध्ये ही बॅटरी चार्ज करता येणार आहे. चेतक ही बजाजची पाहिली इलेकट्रीक स्कुटर आहे. 14 वर्षानंतर चेतक पुन्हा बाजारात येत आहे. बाईकवर लक्ष देण्यासाठी कंपनीने स्कुटर बंद केली होती.

हे असतील नव्या चेतकमधील फीचर्स
नव्या चेतकमध्ये DRLs सोबत horseshoe-shaped LED हेडलाइट्स मिळतील.
फेदरटच एक्टिवेटेड इलेक्ट्रॉनिक स्विचेससोबत मोठा डिजिटल कंसोल देखील दिला जाईल.
दोन रायडींग मोडस, इको आणि स्पोर्ट मोड मिळेल जो की अनुक्रमे 95 किलोमीटर आणि 85 किलोमीटर पर्यंत जाऊ शकेल.

इंटेलिजेंट ब्रेकिंग सिस्टम
तसेच मोबाइल एप्सच्या सहाय्याने डेटा कम्यूनिकेशन, सिक्योरिटी आणि यूजर ऑथेंटिकेशन सुद्धा देण्यात आलेले आहे. किमतीबाबत बोलायचे झाल्यास 90 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत चेतकची किंमत असू शकते.

 

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like