14 जानेवारीला ‘चेतक’चा ‘वनवास’ संपणार, एका चार्जिंगमध्ये 95 KM ‘मायलेज’ देणाऱ्या स्कूटरचे ‘लॉंचिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय बाजारात या वर्षी अनेक इलेकट्रीक वाहनांचे लॉंचिंग करण्यात येणार आहे. या वर्षाची सुरुवात बजाजच्या चेतक या इलेकट्रीक स्कूटरने होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 14 जानेवारीला अधिकृत पद्धतीने लॉंचिंग केले जाणार आहे तसेच थोड्याच दिवसात चेतकची विक्री सुरु होणार आहे. तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर चेतक पुन्हा एकदा रस्त्यावर धावताना दिसणार आहे. KTM डिलरशिपच्या माध्यमातून ही दुचाकी देशभरात पोहचणार आहे. सुरुवातील याला पुण्यात आणि बंगलोरमध्ये लॉंच केले जाईल. यानंतर मात्र चेतक देशभरातील इतर शहरांमध्ये देखील जाईल.

बॅटरी आणि ड्रायव्हिंग रेंज
नव्या बजाज चेतक इलेकट्रीकमध्ये IP67 रेटेड बॅटरीचा प्रयोग केलेला आहे. तसेच यामध्ये स्विंगआर्म माउंटेड मोटारचा देखील वापर केलेला आहे. यामध्ये तुम्हाला दोन वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड देखील मिळतील. ज्यामध्ये इको आणि स्पोर्ट मोड समाविष्ठ आहेत.

हे असतील नव्या चेतकमधील फीचर्स
नव्या चेतकमध्ये DRLs सोबत horseshoe-shaped LED हेडलाइट्स मिळतील. फेदरटच एक्टिवेटेड इलेक्ट्रॉनिक स्विचेससोबत मोठा डिजिटल कंसोल देखील दिला जाईल. दोन रायडींग मोडस, इको आणि स्पोर्ट मोड मिळेल जो की अनुक्रमे 95 किलोमीटर आणि 85 किलोमीटर पर्यंत जाऊ शकेल.

इंटेलिजेंट ब्रेकिंग सिस्टम
तसेच मोबाइल एप्सच्या सहाय्याने डेटा कम्यूनिकेशन, सिक्योरिटी आणि यूजर ऑथेंटिकेशन सुद्धा देण्यात आलेले आहे. किमतीबाबत बोलायचे झाल्यास 90 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत चेतकची किंमत असू शकते.

विकत घेण्यासाठी एवढे पैसे होतील खर्च
चेतकची इतक्यात किंमत सांगणे कठीण आहे तरीही जाणकारांच्या मते एक लाख ते 1.25 लाखापर्यंत किंमत असू शकते.

चार्जिंग आणि वॉरंटी
स्कूटर बाबतच्या अनेक गोष्टी समोर येणे अद्याप बाकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही स्कूटर पाच तासात पूर्णपणे चार्ज होऊ शकणार आहे. यासोबत कंपनी तीन वर्ष किंवा 50 हजार किलोमीटरची वॉरंटी देखील देऊ शकते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/