Bajaj Finserv To Invest Rs 5k Cr In Pune | बजाज फिनसर्व्ह करणार पुण्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक

पुण्यात 40 हजार रोजगारनिर्मिती होणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bajaj Finserv To Invest Rs 5k Cr In Pune | बजाज फिनसर्व्ह आणि महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये (Maharashtra State Govt) सुमारे 5 हजार कोटी रूपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला असून त्यामधून पुण्यात 40 हजार रोजगार उपलब्ध होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. (Bajaj Finserv To Invest Rs 5k Cr In Pune)

 

बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष संजीव बजाज (Sanjiv Bajaj) उपस्थितीत हा करार करण्यात आला आहे. या गुंतवणुकीमुळे पुण्यात 40 हजार रोजगार निर्मिती (Job Creation In Pune) होऊन यामुळे आर्थिक सेवा हब होण्यासाठी पुणे शहराला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या प्रोजेक्टच्या जलद अंमलबजावणीसाठी राज्य सरकारकडून पुर्णपणे सहकार्य देण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

Advt.

बजाज फिनसर्व्हच्या या प्रोजेक्टसाठी पुणे शहरातील मुंढवा (Mundhwa) येथील जमीन सरकारने दिली आहे. त्यासाठी कमी दरात वीज पुरवठा देखील करण्यात येणार असून एफएसआयमध्ये Floor a Space Index (FSI) देखील सूट देण्यात येणार आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा