खुशखबर ! सर्वात स्वस्त बाईक ‘Bajaj CT 110’ भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बजाज ऑटोने नवीन बाईक CT 110 भारतामध्ये लाँच केली आहे. या बाईकच्या किक स्टार्ट ची किंमत ३७,९९७ रुपये आणि सेल्फ स्टार्टची किंमत ४४,३५२ रुपये आहे. बजाज CT 110 च्या या किंमती एक्स शोरूमच्या आहेत. सिटी १०० पेक्षा वेगळा लूक देण्यासाठी बजाजने CT ११० मध्ये अनेक नवीन बदल केले आहेत.

बजाज CT 110मध्ये टॅंक पॅड्स आणि नवीन ग्राफिक्स दिले आहेत. याचे इंजिन, गिअरबॉक्स,फोर्क, विलज, हँडलबार काळ्या कलरमध्ये आहेत. बजाज CT ११० ची सीट मोठी आहे. टेलेस्कोपिक फोर्क्स आणि मिरर्ससाठी रबर कव्हर दिले आहेत. या नवीन बाइकमध्ये प्लॅटिना ११० मध्ये असलेले ११५ cc चे इंजिन आहे. हे इंजिन ८.६ bhp पॉवर आणि ९.८१ Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्स पेक्षा कमी आहे.

या बाईकच्या लाइनअपमध्ये CT 100 आणि प्लॅटिना 100 मधील सेगमेंट लावण्यात आली आहेत. याची डिलिव्हरी अजून सुरु करण्यात आलेली नाही. कंपनीने देशभरात डिलरशिपवर नवीन बाईक पाठवण्यास सुरु केली आहे.

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी ‘हा’ फेसपॅक लावा ; जाणून घ्या प्रोसेस

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

Loading...
You might also like