महाराष्ट्रासह गुजरात आणि युपीमध्ये लॉन्च झाली नॅनोपेक्षाही स्वस्त कार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात लहान कार असलेली ‘बजाज क्युट’ (Bajaj Qute) कार महाराष्ट्रासह गुजरात आणि युपीमध्ये लॉन्च करण्यात आली. चार प्रवाशी बसण्याची सोय असणारी ही कार पेट्रोल किंवा सीएनजीवर चालणारी आहे. या कारची निर्मित्ती भारतात होत असून कारची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री होणार आहे.

बजाज क्युटची वैशिष्ट्ये –

इजिंन – २१६ cc, सिंगल-सिलेंडर, ट्विन-स्पार्क इंजिन, पेट्रोल किंवा सीएनजी इंजिनवर चालणारे , ५-स्पीड गियरबॉक्स
पेट्रोल व्हर्जन – ५५०० आरएमपी, १३ बीएचपी पॉवर
सीएनजी व्हर्जन- १० बीएचपी पॉवर
इंधन टॅंक – ८ लिटर
मायलेज (पेट्रोल) – ३६ kmpl
मायलेज (सीएनजी) – ४३ kmpl
टॉप स्पीड -७०kmph
वजन – ४२५ किलोग्राम

किंमत –

पेट्रोलवर चालणाऱ्या व्हर्जनची किंमत २.६४ लाख रुपये आहे. तर सीएनजीवर चालणाऱ्या व्हर्जनची किंमत २.८४ लाख रुपये आहेत.

सुविधा –

बजाज क्युट एक चतुर्भुज वाहन आहे. इतर वाहनांच्या तुलनेत जागा कमी व्यापते त्यामुळे कमी जागेत गाडी उभी करणे शक्य होणार आहे. १२ इंचाचे रेड ग्रीपचे एलॉय व्हील असणार आहेत. कारमध्ये वातानुकूलीत यंत्रणा नाही. पाऊस आणि उन्हाळ्यापासून संरक्षणासाठी गाडीत Weather protection असणार आहे. या सुविधांसह पर्यावरणाच्यादृष्टीने कमी कार्बन उत्सर्जन करणार आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या या कारमध्ये डीटीएसआय ४ इंजिन बसविण्यात आले असून पेट्रोलची टाकी ८ लिटर क्षमतेची आहे. ही कार एक लिटरमध्ये ३६ किमीचे मायलेज देते

बजाज क्युट ही कार सर्वप्रथम २०१२ मध्ये ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आली होती. तीन चाकी रिक्षाला पर्याय असलेले हे वाहन बाजारपेठेतील वाहनांपेक्षा भिन्न वर्गाचे ठरले होते . त्यामुळे परवानगीवरून ते वादात सापडले होते. २०१२ पासून भारतात क्युट या कारचा चतुर्भज वाहनाच्या श्रेणीमध्ये समावेश व्हावा तसेच या कारला विक्रीची परवानगी मिळावी यासाठी बजाजने दिलेला लढा दिला. त्यानंतर २०१६ मध्ये तिच्या आवृत्तीत बदल करण्यात आले. २०१८ मध्ये भारतीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने चतुर्भज वाहनाच्या निर्मितीला मान्यता दिली. या कारला देशाच्या २० राज्यांत व्यावसायिक वाहन म्हणून तर १५ राज्यांत खाजगी वाहन म्हणून नोंदणी करण्याची परवानगी मिळाली आहे.