कन्हैय्याकुमार यांच्या वाहन ताफ्यावर बजरंग दलाची दगडफेक

पाटणा : वृत्तसंस्था – जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्याकुमार यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक करण्याचा प्रकार बिहारमध्ये मंगळवारी सांयकाळी करण्यात आला. बेगुसराय जिल्ह्यातील दहिया गावाजवळ हा हल्ला झाला. या हल्ल्यात ताफ्यातील अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे कन्हैय्याकुमार समर्थकांचे म्हणणे आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca5ab3ce-d1ce-11e8-a482-9f9021a3a85a’]

बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील भगवानपूर बाजारातील दुर्गा मंदिराजवळ मंगळवारी सांयकाळी कन्हैय्याकुमार समर्थक आणि दुर्गा पूजा समितीच्या सदस्यांमध्ये वाहन पार्क करण्यावरुन वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि कन्हैय्याकुमार यांच्या ताफ्यातील सुमारे अर्धा डझन वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये दुर्गा पूजा समितीचे २ कार्यकर्ते जखमी झाले. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आल्याचे भगवानपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख दीपक कुमार यांनी सांगितले. जखमींच्या तक्रारीनुसार कन्हैय्याकुमार यांच्या ताफ्याविरोधात कारवाई केली जाईल. तर दुसरीकडे कन्हैय्याकुमार आणि त्यांच्या समर्थकांनी जीवघेणा हल्ल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

[amazon_link asins=’B07BSZHSKN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d2a5817e-d1ce-11e8-8549-75c3cee95d7f’]

कन्हैय्याकुमार यांनी भाजप व मोदी यांच्याविरोधात आघाडी उघडल्याने ते जेथे जातात, त्या ठिकाणी त्यांना भाजप व संघाशी संबंधित संघटनांकडून काही ना काही कारण काढून विरोध केला जातो. देशभरात मोदी विरोधात कन्हैय्याकुमार हे विविध संघटना, पक्षाच्या माध्यमातून सभा घेत आहेत़ त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांच्या या कार्यक्रमात सातत्याने अडथळे आणण्यात येत आहे. त्यातूनच बिहारमधील हा प्रकार घडला असावा असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

जाहीरात