Bajrang Sonawane On Amol Mitkari | अमोल मिटकरी अजित पवारांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का? बजरंग सोनवणेंचा मिटकरींना खोचक टोला

ADV

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Bajrang Sonawane On Amol Mitkari | अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) आमदार अमोल मिटकरी यांनी मंगळवारी ”बीडच्या बाप्पांचा दादांना फोन” आल्याचे ट्विट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यात #मोठ्यामनाचादादा असा हॅशटॅग वापरण्यात आला होता. अमोल मिटकरींच्या या आरोपावर आता बजरंग सोनवणे यांनी उत्तर दिले आहे. (Beed Lok Sabha)

अमोल मिटकरी यांच्या ट्विटनंतर माध्यमांशी बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, अमोल मिटकरी कोण आहेत? ते अजित दादांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का? कारण ऑपरेटर कडेच फोनचे रेकॉर्ड असते. माझ्या बीड जिल्ह्यातील जनतेने मला खूप प्रेम दिले आहे. माझ्या मनात जर काही पाप असेल तर मी घराच्या बाहेर पडताच बीड जिल्ह्यातील जनता मला चपलेने मारेल.(Bajrang Sonawane On Amol Mitkari)

पवार साहेबांना सोडायचे म्हटल्यावर तर माझे वडील मला कानसुलीत लगावतील. माझी बायको म्हणेल तुला खायला पण नाही, नाश्ता देखील नाही, अशी परिस्थिती होईल. अमोल मिटकरी हे दिग्गज नाव मी काय बघितलं नाही. ते ट्विट करतात आणि त्याची दखल घ्यावी इतकी त्यांची पात्रता नाही. म्हणून दखल घेतली नसल्याचे बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे.

माझा कारखाना अडचणीत नाही. माझ्या कोणत्याही सभासदाला विचारुन घ्या.
बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मागील १२ वर्षांपासून नियमित पैसे देत आहे. अमोल मिटकरी याचा ट्विट करण्याचा धनी किंवा त्याचा बोलविता धनी कोण आहे? हे अमोल मिटकरी यांनी सांगावे. असे सोनवणे यांनी म्हंटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | अजित पवारांसमोर मोठे धर्मसंकट? राज्यसभेचे तिकीट मुलाला, पत्नीला की अन्य…?, उमेदवार ठरेना

Lonikand Pune Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, दागिने अन् पैसे घेऊन प्रियकर पसार

Malshej Ghat Accident | माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळली; चुलता- पुतण्याचा जागीच मृत्यू