बजरंगची कुस्तीत सुवर्ण कामगिरी : भारताला आशियाई स्पर्धेत पहिलं गोल्ड

जकार्ता : वृत्तसंस्था 
भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियांन याने आशियाई  स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. तो ६५ किलो वजनी गटात जपानच्या दाईची ताकातानीचा ११-८ नं मात केली. सुरुवातीलाच बजरंगाने चढाई करत ६ गुणांची आघाडी घेतली, मात्र जपानच्या दाईची ताकातानीचा आक्रमक खेळी करत डाव  ६-४ अशा रंगतदार अवस्थेमध्ये आणला. पण शेवटी बजरंगने संयमी वृत्तीने फायनल पंच मारत ताकातानीला ११-८ नं धूळ चारून भाराच्या पारड्यात पहिलं सुवर्ण पाडले. सुवर्ण पदकाचा आनंद घेत, त्याने हे पदक भारताच्या माजी दिवंग पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना अर्पण केलं आहे. ६ ऑगस्टला अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं होतं. यातून त्याच्या खिलाडू वृत्तीच दर्शन घडलं.
[amazon_link asins=’B079QL72TV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’26d819b5-a452-11e8-a45c-2982aa01f387′]
भारताची पहिल्या दिवासाची पदकांची कमाई 
भारताने पहिल्या दिवशी १० मीटर एयर राइफल मिक्सडमध्ये अपूर्वी चंदीला आणि रवी कुमार यांनी कांस्य पदक जिंकलं आहे.  या जोडीने 10 मीटर एअर रायफल मिश्र दुहेरी प्रकारात कांस्यपदक पटकावलं.  स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय नेमबाजांनी पहिलं पदक भारताच्या नावे केलं. अपूर्वी आणि रवी कुमार या जोडीने 429.9 गुणांची नोंद केली.
आज वेगवेगळ्या स्पर्धांना सुरुवात झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.