डायरेक्टर कबीर खानच्या पत्नीनं शेअर केले बिकीनीतले ‘BOLD’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बजरंगी भाईजानचा डायरेक्टर कबीर खान सध्या फॅमिलीसोबत मालदीवला व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. यावेळी त्याची अ‍ॅक्ट्रेस पत्नी मिनी माथुरचा खूपच बोल्ड अंदाज पहायला मिळाला.

मिनी ग्रीन कलरच्या फ्लोरल ड्रेसमध्ये खूपच बोल्ड आणि स्टायलिश दिसून आली. यावेळी तिची मुलगी सान्या खानही होती. एका फोटोत मिनी ग्रीन कलरच्या मोनोकनीमध्ये दिसत आहे. आणखी एका फोटोत तिनं बिकीनी घातल्याचंही दिसत आहे.

एका फोटोत मिनी पतीसोबत बोटीत झोपलेली दिसत आहे. कपलचे व्हकेशन एन्जॉय करतानाचे हे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनाही फोटो खूप आवडले आहे.

खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर कबीर आणि मिनी माथुर 2006 साली विवाहबद्ध झाले होते. त्यांना दोन मुलंही आहेत. मुलाचं नाव विवान खान आणि मुलीचं नाव सान्या खान आहे.

मिनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर मिनी अनेक बॉलिवूड सिनेमात दिसली आहे. याशिवाय तिनं काही वेब सीरीजमध्येही काम केलं आहे. कबीर बद्दल सागंयाचं झालं तो बॉलिवूडमधील प्रसिद्ध डायरेक्टर आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like