‘ही अभिनेत्री कधीही सुपरस्टार होणार नाही’, KRK नं केलं वादग्रस्त विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्वयंघोषित फिल्म क्रिटीक आणि अ‍ॅक्टर कमाल राशिद खान (Kamaal Rashid Khan) ऊर्फ केआरके आपल्या वादग्रस्त विधानामुळं कायमच चर्चेत येत असतो. तो अनेकदा सेलिब्रिटींवरही टीका करत असतो. सलमान खानच्या (Salman Khan) बजरंगी भाईजान (Bajrangi Bhaijaan) सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा (Harshaali Malhotra) हिच्यावर त्यानं निशाणा साधला आहे. हर्षाली कधीही मोठी अभिनेत्री होणार नाही, असं म्हणत कमालनं वादग्रस्त विधान केलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतरही त्यानं अनेक विधानं केली होती. ज्यामुळं तो चर्चेत आला होता.

काय म्हणाला केआरके ?
कमाल आर. खान म्हणाला, मी 100 टक्के खात्री देतो ही मुलगी कधीही मोठी अभिनेत्री होऊ शकणार नाही. लहानपणीच प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक बालकलाकाराची हीच अवस्था आहे. ही मुलं स्वत:ला सुपरस्टार समजू लागतात. परंतु त्यांनाही पुन्हा एकदा शून्यापासून सुरुवात करावी लागते, असं ट्विट करत कमालनं हर्षालीवर टीका केली आहे. सध्या त्याचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमालच्या या ट्विटवर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हर्षालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं, तर ती सलमानच्या बजरंगी भाईजान सिनेमात झळकली होती. सिनेमात तिनं मुन्नी हे पात्र साकारलं होतं. तिच्या भूमिकेचं खूप कौतुक होताना दिसलं होतं.

You might also like