नीरा येथे बकरी ईद उत्साहात साजरी

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन – पुरंदर तालुक्यातील नीरा येथे बकरी ईद (ईद उल अज्झा) सोमवारी (दि.१२) उत्साहात साजरी करण्यात आली. ईदनिमित्ताने मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
नीरेतील स्टेशन मस्जिद येथे मौलाना अब्दुल लतिफ इरफान अली शेख यांच्या नेतृत्वाखाली ईदगाह मैदानात नमाज पठण करण्यात आले. तसेच अंजुमन तारीमुल कुरआन येथील मस्जिदमध्ये मौलाना सद्दाम हुसेन सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण करण्यात आले.

मौलाना अब्दुल लतिफ शेख यांनी बकरी ईदच्या सणाला मुस्लिम धर्मियांत विशेष महत्व आहे असे स्पष्ट केले. इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत हब्राहिम अलैही सलाम यांना अल्लाहने स्वतःच्या आवडत्या वस्तूचे त्याग करण्याचा आदेश दिला होता. अल्लाहच्या या आदेशानुसार हजरत इब्राहिम यांनी त्यांची आवडती व्यक्ती त्यांचे सुपुञ हजरत इस्माईल यांचा त्याग करण्याची वृत्ती अल्लाहच्या पसंतीस उतरली. त्यावेळी हजरत इस्माईल यांना वाचवण्यासाठी अल्लाहने त्यांच्या जागी बक-याला ठेवले.

त्यावेळी बक-याची कुर्बानी देण्यात आली. अशा रितीने मौलाना अब्दुल लतिफ शेख यांनी पैगंबर हजरत इब्राहिम यांच्या आठवणींना उजाळा दिला. यामुळे यावेळी नीरा व परिसरातील बहुसंख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. यावेळी स्टेशन मस्जिदमध्ये पुणे जि.प.चे माजी सभापती दत्ताजी चव्हाण, माजी सरपंच राजेश काकडे, माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले, दिपक काकडे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

आरोग्यविषयक वृत्त –