बकरी ईद : फ्लॅट आणि सोसायटी परिसरात कुर्बानी देण्यास बंदी – उच्च न्यायालय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बकरी ईद दिवशी देण्यात येणाऱ्या कुर्बानी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. बकरी ईदसाठी फ्लॅट आणि सोसायटी परिसरात कुर्बानी देण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. बकरी ईदसाठी कत्तलखान्याबाहेर तसंच खासगी जागांसाठी देण्यात आलेल्या परवान्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल कऱण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. प्राणीमित्र संघटनेकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती.

फ्लॅट आणि सोसायटी परिसरात कुर्बानी देण्यास मनाई केल्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडे आलेले सुमारे ८ हजार परवाने रद्द होणार आहे. उच्च न्यायालयाने मनाई करताना समुदायिक केंद्रात कुर्बानीची सोय असलेल्या ठिकाणी एक किलोमीटरच्या परिसरात कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला स्वतंत्र परवानगी देऊ नका असं आपल्या आदेशात म्हटलं आहे.

बकरी ईदसाठी पालिकेने ऑनलाइन जाहिरात दिली होती. या जाहिरातीमधून तात्पुरत्या काळासाठी बकरे कटाईचे परवाना देण्याचं सूचित करण्यात आलं होतं. मात्र काही प्राणीमित्र संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल करत या निर्णयाला आव्हान दिलं होतं.

आरोग्यविषयक वृत्त –