Bakrid | बकरी ईदला जनावरांच्या कुर्बानीविरोधात मुस्लिम तरूणानं उघडला ‘मोर्चा’, 72 तासाचा केला ‘रोजा’

नवी दिल्ली : संपूर्ण देशात ईद उल अजहाचा सण म्हणजे बकरी ईद (Bakrid) साजरी करण्यात आली. या सणानिमित्त जनावरांचा बळी दिला जातो. परंतु या बळी प्रथेविरूद्ध पश्चिम बंगालच्या एका मुस्लिम तरूणाने अभियान सुरू केले. पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये राहणार्‍या अल्ताब हुसैनने बकरी ईदनिमित्त (Bakrid) जनावरांची कुर्बानी चुकीची असल्याचे म्हणत याविरूद्ध आवाज उठवला आणि 72 तासाचा रोजा ठेवला. हुसैनने मंगळवारी रात्री हा रोजा सुरू केला होता.

कुटुंबात होते कुर्बानी

महत्वाची गोष्ट ही आहे की हुसैनचे भाऊ नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा बकरी ईदनिमित्त कापण्यासाठी बकरा घेऊन आले, जो पाहून हुसैन अजिबात आनंदी झाला नाही. हुसैनचे म्हणणे आहे की, जनावरांवरील क्रुरता खुप वाढली आहे, परंतु याविरूद्ध कुणी आवाज उठवत नाही. मला लोकांचे या मुद्द्यावकडे लक्ष वेधायचे आहे. यासाठीच मी 72 तासांचा उपवास ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Bakrid | muslim man on 72 hour fast against the sacrifice of animals on eid

2014 पासून झाला शाकाहारी

अल्ताब हुसैन 2014 पासून शाकाहारी झाला आहे. जेव्हा हुसैन डेयरीच्या व्यापारात होता तेव्हा त्याने व्हिडिओ पाहिला होता, ज्यामध्ये पशुंसोबत खुप क्रूर वर्तणूक केली जात आहे. यानंतर त्याने मांस खाणे सोडले होते, इतकेच नव्हे हुसैनने चामड्याच्या वस्तू वापरणे सुद्धा सोडले होते. मात्र, हुसैनचे कुटुंब त्याच्या विचाराशी सहमत नाही आणि त्यांना वाटते की कुर्बानी अतिशय आवश्यक आहे.

लोक देतात धमकी

आपले अनुभव शेयर करताना हुसैनने सांगितले की, पशु हत्येविरूद्ध आवाज उठवल्याने मला सोशल मीडियावर धमक्या मिळू लागल्या आहेत, हिंदू समजातील सुद्धा अनेक लोक माझ्या विरूद्ध आहेत कारण मी डेयरी उत्पादनांचा सुद्धा विरोध करतो, परंतु एक गट असाही आहे जो माझे समर्थन करतो.

आपल्या शाकाहारी जीवनाबाबत हुसैन सांगतो की, मी सुद्धा अगोदर कुर्बानी करत होतो, परंतु जेव्हा मी याचा एक व्हिडिओ पाहिली की कशाप्रकारे जनावरांना मारहाण केली जात आहे, त्यांना जास्त दूधासाठी इंजेक्शन दिले जात आहे तेव्हा मी सर्वप्रकारचे मांस वर्ज्य केले.

घरातून बाहेर काढले होते

अल्ताबने सांगितले की, जेव्हा मी माझ्या घरात गाईच्या कुर्बानीला विरोध केला तेव्हा मला घरातून
बाहेर काढण्यात आले होते आणि सुमारे एक महिन्यानंतर मी माझ्या घरातील लोकांची माफी
मागितली आणि परत आलो. त्यानंतर मी जनावरांच्या कुर्बानीला थेट विरोध करण्याऐवजी उदार
पद्धत अवलंबण्यास सुरूवात केली. ज्यामुळे लोकांना याबाबत समजावता येईल.

मी सोशल मीडियावर कुर्बानीची छायाचित्रे आणि माझ्या भावाचा फोटो आणि फोन नंबर शेयर केला
होता, ज्यामुळे त्याला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता.

हे देखील वाचा

IRCTC News : आता ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंगपूर्वी करावे लागेल मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

Pune Crime | कोंढवा पोलिसांकडून पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या भाजपच्या माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरात बॉर्डरवरून अटक

Suspension | ‘त्या’ चार वरिष्ठांवर कारवाई झाल्यानंतर ‘उत्पादन शुल्क’च्या 4 बड्या अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; आयुक्त कांतीलाल उमाप यांची कारवाई, जाणून घ्या प्रकरण


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Bakrid | muslim man on 72 hour fast against the sacrifice of animals on eid

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update