Bal Bothe : रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे आणखी ‘गोत्यात’; जाणून घ्या प्रकरण

अहमदनगर : Bal Bothe | संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणार्‍या रेखा जरे खून प्रकरणातील (Rekha Jare murder case) आरोपी पत्रकार बाळ बोठे (journalist accuse Bal Bothe) याने पारनेरच्या कोठडीत (Parner’s Jail) मोबाइलचा वापर केल्याचे (used a mobile phone) उघड झाले होते. या प्रकरणी त्याच्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्याने आता दोषारोपपत्र (chargesheet) दाखल झाले आहे. पारनेर पोलिसांनी ही माहिती दिली.

जरे खून प्रकरणी जामीनावर आज निर्णय

बोठे (Bal Bothe) विरुद्ध नगर शहरात खंडणी आणि विनयभंगाचेही गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांचा तपास सुरू आहे. दरम्यान, रेखा जरे खून प्रकरणी जामीन अर्जावर जिल्हा न्यायालय आज (सोमवारी) निर्णय देणार आहे. अटक आरोपी बाळ बोठे हा पारनेर येथील कोठडीत आहे. या न्यायालयीन कोठडीत मोबाइल आढळून आला होता.

High BP | डायबिटीजपासून हाय BP पर्यंत तूपात ‘या’ 5 वस्तू मिसळून खाल्ल्याने दूर होतील अनेक आजार; जाणून घ्या

कारागृहातून मोबाइलद्वारे साधला वकिलाशी संपर्क

यानंतर उपअधीक्षक अजित पाटील, पारनेरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी कारागृहाची झडती घेतली असता याच कोठडीत दुसर्‍या गुन्ह्यातील एका आरोपींकडे दोन मोबाइल सापडले होते.

आरोपींनी हे मोबाइल पाईपमध्ये लपवून ठेवले होते. पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला असता बोठे यानेही वकिलाशी संपर्क करण्यासाठी त्या मोबाइलचा वापर केल्याचे निष्पन्न झाले.

पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

नंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला. तपास पूर्ण झाल्यानंतर आता सर्व आरोपींविरुद्ध पारनेरच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, रेखा जरे खून प्रकरणी यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल असून जामीनासाठी बोठेने अर्ज केला आहे. त्यावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय 20 सप्टेंबरला निकाल देणार आहे.

आणखी दोन गुन्ह्यांचा तपास प्रलंबित

दरम्यान, रेखा जरे खून प्रकरण उजेडात आल्यानंतर या गुन्ह्यापूर्वी घडलेल्या दोन घटनांचे गुन्हेही बोठेविरुद्ध दाखल करण्यात आले.
यामध्ये महिलेने विनयभंगाची तर दुसर्‍या महिलेने नोकरी टिकविण्यासाठी खंडणी मागितल्याची तक्रार केली आहे.

या महिलांच्या तक्रारीवरून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांचा तपास अजूनही सुरू आहे.

हे देखील वाचा

Ramdas Kadam | ‘वैभव खेडेकरांच्या आरोपांना भीक घालत नाही, ते मनसेचे की राष्ट्रवादीचे?’ असा खेडच्या जनतेला प्रश्न – रामदास कदम

Section 144 In Kolhapur | किरीट सोमय्यांचा कोल्हापूर दौरा ! जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Bal Bothe | another chargesheet filed against bal bothe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update