बालाकोट हल्ल्याच्या दुसर्‍याच दिवशी पाकिस्तानी सैन्यांवर ‘अटॅक’च्या तयारीत होतो : माजी वायुसेना प्रमुख बीएस धनोआ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीय वायु सेना (Indian Air Force) चे माजी प्रमुख बीएस धनोआ (BS Dhanoa) यांनी सांगितले की बालाकोट हवाई हल्ले (Balakot air strike) हे पाकिस्तानी आस्थापने आणि दहशतवादी संघटना यांना सांगणे होते की भारतातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर देऊन हल्ल्याची किंमत मोजावी लागेल. आणि हा संदेश प्रभावीपणे शेजारच्या देशापर्यंत पोहचला. पंजाब सरकार आणि चंदीगड प्रशासनाद्वारे आयोजित सैन्य साहित्य महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी ‘बालाकोटचा संदेश समजून घेणे’ या विषयावरील चर्चेदरम्यान हवाई दलाचे माजी प्रमुख बोलत होते.

धनोआ म्हणाले, ‘बालाकोटचा संदेश पाकिस्तानी आस्थापने आणि दहशतवादी संघटनांना सांगायचा होता की भारतातील दहशतवादी हल्ल्याची किंमत मोजावी लागेल, जे प्रभावीपणे कळविण्यात आले आहे. आमच्या बाजूने… काही ‘चुका’ झाल्या आहेत, ज्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या आहेत आणि यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा केली जाईल. आम्ही २७ फेब्रुवारी रोजी पीएएफ (पाकिस्तान एअर फोर्स) विरूद्ध (पाकिस्तान एअर फोर्सने बालाकोट हल्ल्याच्या एक दिवसानंतर जवाबी कारवाई केली तेव्हा) महत्त्वपूर्ण कारवाई करू शकलो नाही.’

धनोआ म्हणाले की, २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यानंतरच पाकिस्तानचे सैन्य आमच्या निशाण्यावर होते. आम्ही त्याच्याविरूद्ध हल्ल्यासाठी सज्ज होतो. ते म्हणाले की, हवाई दलाचे लक्ष्य केवळ सीमेला लागून असलेले पाकिस्तानी लपलेले ठिकाण नाही तर इतर ब्रिगेड क्षेत्रे देखील होती.

POK मधील दहशतवाद्यांच्या लाँच पॅड ला उध्वस्त केले

धनोआ यांनी जोर देऊन सांगितले की दहशतवादी हल्ल्यांना भारत सरकारने ज्या प्रकारे प्रत्युत्तर दिले ते वाखाणण्याजोगे आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताकडून कोणतीही लष्करी कारवाई झाली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ३० सप्टेंबर रोजी हवाई दलाचे प्रमुख म्हणून निवृत्त झालेले धनोआ म्हणाले, “२०१६ च्या उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्याने प्रथमच प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचा लॉन्च पॅड पाडला.”

ते म्हणाले की, पाकिस्तानला हा संदेश मिळाला आहे की नवीन सरकार आपल्या भूमीवर होणाऱ्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांना सैनिकी पद्धतीने प्रत्युत्तर देईल. धनोआ म्हणाले की, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्ल्यानंतर त्याचा बदला घेण्यात येईल अशी भीती पाकिस्तानी आस्थापनांमध्ये आहे. या हल्ल्यात ४० लोक ठार झाले.

‘फक्त दोन प्रश्न होते – त्याचा बदला कधी व कोठे घेण्यात येईल, माजी एअर चीफ मार्शल म्हणाले की, पुलवामा हल्ल्यामागील याच दहशतवादी संघटनेचा हात असल्याने बालाकोटस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.

धानोआ म्हणाले, ‘सरकार आणि राजकीय इच्छाशक्ती स्पष्ट होती आणि जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानी आस्थापना यांना सांगायचे होते की तुम्ही कुठेही असलात तरी अशा हल्ल्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. भले तो भाग पाकिस्तानकडील काश्मीर चा असो की मग पाकिस्तान असो आम्ही तुम्हाला ठार मारू आणि हाच बालाकोटचा संदेश आहे.’ पाकिस्तानच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीकडे लक्ष वेधताना धनोआ म्हणाले की, फेब्रुवारी २०१९ मध्ये शेजारचा देश प्रचंड आर्थिक संकटाच्या काळातून जात होता.

यावर्षी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने हवाई हल्ल्याद्वारे २६ फेब्रुवारी रोजी बालाकोटमध्ये असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षण केंद्र पाडून टाकले. पाकिस्तानी हवाई दलाने दुसर्‍या दिवशी जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/