आता ‘या’ अधिकाऱ्यानेही दिला मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याला दुजोरा

भटिंडा : वृतसंस्था – एअर मार्शल रघुनाथ नांबियार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रडार संबंधी केलेल्या वक्तव्याचा बचाव केला आहे. त्यांनी म्हंटले की, ढगांच्या दाटिवाटीमुळे रडारला विमान शोधायला अडचण येते. एअर चीफ मार्शल बीएस धनोआ आणि एअर मार्शल आर नांबियार यांनी पंजाबमधील भिसियाना एयरफोर्स स्टेशन वर न्यूज एजेंशी संवाद साधताना ही माहिती दिली. या ठिकाणी दोघांनीही कारगिल युद्धात शहीद झालेल्या स्क्वाड्रन लीडर अजय आहूजा यांना मिग-21 उडवून श्रद्धांजली दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखतीत म्हणाले होते, बालाकोट एअर स्ट्राईकची योजना बनत असताना मी तज्ञांना सांगितले होते की आकाशातील असलेल्या ढगांमुळे आणि पावसामुळे आपली विमाने रडारच्या रेंजपासून लपू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रडार संबंधी केलेल्या या वक्तव्यामुळे बरेच वाद निर्माण झाले होते.

सेना प्रमुख बिपीन रावत यांनीही पंतप्रधानांच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता. रावत म्हणाले होते की, रडारचे वेगवेगळे प्रकार असतात. काही रडार ढगांतून प्रवास करणाऱ्या विमानांना पकडू शकत नाहीत. तर काही रडार ढगांतून प्रवास करणाऱ्या विमानांचाही शोध घेऊ शकतात.

२६ फेब्रुवारीला भारतीय वायुसेनेने केला होता बालाकोट एअर स्ट्राईक

१४ फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये ४४ जवान शहिद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या संघट्नेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. यानंतर भारतीय वायुसेनेने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला होता.