माहितीय का ? ‘मिशन बंदर’ असं नाव होतं बालाकोट ‘एअरस्टाइक’च्या मिशनचं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ बॉम्बहल्ला करत उद्ध्वस्त केला. एअर स्ट्राइकच्या कारवाईच्या कोडनेमबद्दल प्रथमच खुलासा झाला आहे. हवाई कारवाईला ‘ऑपरेशन बंदर’ (Operation Bandar) असं नावं देण्यात आलं आहे. अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

रामायनात हनुमानाने लंकेत उड्डाण घेऊन रावनाची लंका दहन केली होती. यापासून प्रेरणाघेऊन ऑपरेशन बंदर असं नाव देण्यात अशी माहिती मिळाली आहे. ही मोहीम अतिशय गुप्तपणे राबविण्यात आली. अशी मोहिम आखताना त्याची माहिती बाहेर जाऊ नये म्हणून कोडनेम देण्यात आले.

एअर स्ट्राईक –

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने एअर स्ट्राईक केला.

वायुसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ १००० हजार किलोचा बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केला . या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले. सर्जिकल स्ट्राइक-२ मुळे पाकिस्तानला मोठी चपराक बसली आहे.

आरोग्यविषयक वृत्त – 

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …!

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी ” 

या कारणामुळे होतो ” ब्रेस्ट कॅन्सर “जाणून घ्या याची लक्षणे

आजारापासून बचाव करण्यासाठी ‘मुळा’ गुणकारी, रहाल निरोगी

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव