एअरस्ट्राईक ! ‘या’ पध्दतीनं वायुसेनेनं पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये बॉम्बचा पाऊस पाडला (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून बालाकोटमधील जैशे मोहम्मदच्या स्थानावर बॉम्ब हल्ला केला होता. हवाई दलाकडून शुक्रवारी या सर्व घटनेचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला आहे.

नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये
हवाई दलाने या व्हिडिओमध्ये दाखवले आहे की पुलवामा हल्ल्यानंतर देशामध्ये काय वातावरण तयार झाले होते आणि लोकांची पाकिस्तानविषयीची भावना काय होती. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की वायू सेनेने कशा प्रकारे एअर स्ट्राईकचे नियोजन केले आणि नंतर बालाकोटमध्ये सुरु असलेल्या अतिरेकी अड्ड्यावर हल्ला केला.

त्याचप्रमाणे बालाकोट झाल्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला होता मात्र भारतीय सैन्याने त्याला चोख प्रतिउत्तर दिले. याचीही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.