बालाकोट ‘एयरस्ट्राइक’चे हिरो विंग कमांडर अभिनंदन आणि स्कॉड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांचा होणार ‘सन्मान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बालाकोट एयर स्ट्राइकचे हिरो विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारतीय वायुसेना प्रशस्ति पत्रक देऊन सम्मानित करणार आहे. वायुसेना अध्यक्ष आरकेएस भदौरिया यांच्या हस्ते 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या हवाई हल्याला अपयशी करण्यामध्ये आणि पाकिस्तानच्या एफ -16 लढाऊ विमानाला मारण्यासाठी वर्धमान यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्यातर्फे हा पुरस्कार कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन सतीश पवार स्वीकारणार आहेत.

याचप्रमाणे 26 फेब्रुवारी रोजी ‘ऑपरेशन बंदर’ नुसार बालाकोटमध्ये एयर स्ट्राइकमध्ये कामगिरी करणाऱ्यांना देखील यावेळी सन्मानित केले जाणार आहे. तसेच बालाकोटमधील हवाई हल्ल्यामध्ये आपले योगदान देणाऱ्या आणि 27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला परतवून लावणाऱ्या मिंटी अग्रवाल यांनादेखील यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

काय झाले होते नेमके त्या दिवशी

पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करताना अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी पॅराशूटने बाहेर उडी मारली आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. नंतर त्यांना पकडण्यात आले. परंतु भारताच्या मुत्सद्दी दबावामुळे पाकिस्तानला अभिनंदनला 48 तासांत परत पाठवावे लागले होते.

या आधीही सरकारने केला होता सन्मान
अभिनंदन यांनी मोठ्या शौर्याने आपले काम पूर्ण केले होते. यामध्ये जीवाची पर्वा न करता ते शत्रूवर तुटून पडले होते त्यामुळे अभिनंदन यांच्या या धाडसी कार्याची दखल घेऊनच सरकारने त्यांना वीरचक्र पुरस्काराने सन्मानित केले होते.

Visit : Policenama.com