प्रशासक म्हणून बाळासाहेब देशमुख यांची कामगीरी ‘सरस’च

थेऊर : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बाळासाहेब देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे निराधार व तथ्यहीन असून एक कुशल प्रशासक आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीस लाभला आहे अशी अनेक शेतकरी व व्यापारी यांची भावना आहे त्यामुळे त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची शासनाची जबाबदारी आहे अशी भावना शेतकर्यांनी व्यक्त केली.

कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये प्रशासक म्हणून देशमुख यांची नियुक्ती होण्यापूर्वी संचालक मंडळाच्या सुमार कारभारामुळे बाजार समितीस जवळपास ७ते८ कोटी रुपये तोटा होत असे.परंतु देशमुख यांनी प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर सर्व कामांचा आढावा व माहिती घेऊन तत्कालीन संचालक मंडळाने महानगरपालिकेची परवानगी न घेताच ५४कोटींची कामे हाती घेतली होती त्या कामाला स्थगिती दिली.तसेच व्यापारी वर्गाकडून वाहनतळ व गाळ्यांसाठी मागणी केल्यानंतर १०२कोटींचा आराखडा तयार करुन तो प्रस्ताव पणन मंडळाकडे पाठवला याचा आराखडा तयार करून महानगरपालिकेकडे मंजुरी साठी पाठवण्यात आला मंजूर आराखड्यावर आतापर्यंत त्यातील ३८कोटी खर्च झाल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत व्यापारी व शेतकरी यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, तोट्यात असलेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशमुख यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यापासून बाजार समिती व कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधी मिळून जवळपास २०० कोटी रुपयांच्या ठेवी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा केल्या आहेत.अध्यक्ष शिवाजीराव कोंडे यांनी त्यांच्या कार्यकालात खेड शिवापूर येथील ५ एकर गायरान जागा मिळवून दिली होती मात्र २५वर्षात कोणतेही काम या जागेवर न झाल्याने ही जागा पुन्हा शासनाने ताब्यात घेतली होती या जागेबाबत देशमुखांनी शासनाकडे पाठपुरावा करून पुन्हा बाजार समितीच्या ताब्यात मिळवून दिली.

फुलबाजार विभागाची २ एकर जागा मॅफकोने ताब्यात घेतली होती तसेच वाहनतळाची ३.५ एकर तर मोशी येथील ९ एकर जागा देखील देशमुख यांनी बाजार समितीच्या ताब्यात घेतली आज शेतकरी व व्यापारी यांचे कल्याण करणाऱ्या देशमुखांची चौकशी करण्याऐवजी तत्कालीन बाजार समितीच्या संचालक मंडळाची व थेऊर येथील यशवंत सहकारी कारखान्यातील संचालक मंडळाच्या विरोधातील जिल्हा निबंधक यांनी थांबलेली कारवाई केली तर हे शेतकऱ्यांचे शेतकरी बांधवांचे भले होईल याबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार ,पालक मंत्री अजित पवार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांना भेटणार असल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली आहे.