बाळासाहेब मालुसरे यांची शिवसेनेच्या पुणे शहर उपप्रमुखपदी नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, शहरप्रमुख संजय मोरे यांनी पुणे उपशहरप्रमुख म्हणून बाळासाहेब मालुसरे यांची नियुक्ती केली आहे. मुंबईतील सेनाभवन येथे मालुसरे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. मालुसरे यांच्या नियुक्तीचे शहर आणि परिसरातील कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

निवड झाल्यानंतर मालुसरे म्हणाले की, मंडई विद्यापीठ कट्ट्यांच्या माध्यमातून मान्यवरांशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू आहे. या माध्यमातून मान्यवरांशी संवाद होऊन नवनवीन संकल्पना राबविल्या जातात. आजपर्यंत सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून काम करत आहे. आता पक्षाने जबाबदारी दिली ती, समर्थपणे सांभाळत पक्षवाढीसाठी प्रयत्न असणार आहेच. सामान्यांना मदतीचा हात देण्यात आजपर्यंत मी धन्यता मानली आहे. भविष्यातही कामाची पद्धती अशीच असणार आहे. वारकरी आणि शाळकरी महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि वारकऱ्यांना अन्नदानाबरोबर पायताण, रेनकोट, प्रथमोपचार पेटी देण्यात मनोमन समाधान वाटत आहे, असे त्यांनी सांगितले.