Balasaheb Murkute | BJP च्या माजी आमदाराचा MSEB कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  Balasaheb Murkute | अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा (Nevasa) वीज वितरण कार्यालयात (MSEB) एक धक्कादायक प्रकार समोर आले आहे. भाजपचे (BJP) माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute) यांनी आज (मंगळवारी) गळफास घेत आत्महत्या (Attempted suicide) करण्याचा प्रयत्न केला आहे. कृषीपंप वीजतोड प्रकरणी संताप व्यक्त करताना मुरकुटे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. संबधित घटनेचा थरारक व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे.

 

कृषी पंप वीजतोडी विरोधात भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.
3 तास ठिय्या आंदोलन करून देखील मागणी मान्य होत नसल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute) प्रचंड आक्रमक झाले.
त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता.
आत्महत्या केल्यानंतर आपल्या आंदोलनाची दखल घेतली जाईल, या उद्विग्नतेतून त्यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

 

दरम्यान, संबंधित घटनेचा व्हिडीओ देखील समोर आलाय. विशेष म्हणजे मुख्य अभियंतासमोर हा सगळा प्रकार घडला आहे.
शेतकऱ्यांचे कृषीपंपाची वीज कापली जात आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक काढता येत नाही.
या विरोधात बाळासाहेब मुरकुटे यांनी वारंवार तक्रारी दिल्या होत्या.
पण कुणीच दखल घेत नाही म्हणून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
पण कार्यकर्त्यांनी वेळीच रोखले. त्यानंतर मुरकुटे यांना रुग्णालयात दाखल केले.
सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आलीय.

 

Web Title : Balasaheb Murkute | former bjp mla balasaheb murkute tried to commit suicide by hanging himself at the mscb office

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

DGP Sanjay Pandey | UPSC पॅनेलच्या शॉर्टलिस्टमध्ये ‘या’ तीन अधिकाऱ्यांची नावे, DGP संजय पाडे यांचे नावच नाही

Customer Care Number साठी तुम्ही सुद्धा करत असाल Google Search तर रिकामा होऊ शकतो खिसा! हॅकर्सचे लक्ष तुमच्या बँक खात्यावर

ST Workers Strike | कोर्टाचा निर्णय येईपर्यंत पर्यायी तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील, कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्र्यांचे आवाहन