बाळासाहेबांनीही पवारांचा सल्ला ऐकला, मी नाही का ऐकणार ?

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रतिभाताई पाटील यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त नागपूरात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरच्या वतीने नागरिक सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रतिभाताई पाटील यांनी प्रतिपादन केले की वैयक्तिक धर्म पाळणं हा ज्याचा त्याचा आधिकार आहे, मात्र त्यामुळे इतर धर्माबद्दल तिरस्कार करता कामा नये. यावेळी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री आणि शरद पवार याचं कौतूक देखील प्रतिभाताई पाटील यांनी केलं. तसेच मुख्यमंत्र्यांकडून आशा व्यक्त केले की विदर्भाचा जलद आणि सर्वंकष विकास व्हावा. महाराष्ट्राची संस्कृती आहे लेकी बाळांचा सन्मान करणं. तेच थोरपण बाळासाहेबांना मला राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा देऊन सिद्ध केलं असंही त्या म्हणाल्या.

यावेळी शरद पवार म्हणाले की आपल्या पदाचा देशाला आणि महाराष्ट्राला कसा उपयोग होईल याचा मी सातत्याने विचार केला, प्रामाणिकपणे आणि सन्मानाने राष्ट्रपतीपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. प्रतिभाताईंना आपण पाच वर्षांना ज्यूनिअर आहोत मात्र आपण मुख्यमंत्री असताना प्रतिभाताई पाटील यांनी विरोधीपक्ष नेता म्हणून आपले वेगळेपण कायमच सिद्ध केले.

प्रतिभाताई आणि प्रणव मुखर्जींसाठी पाठिंबा मिळविण्याकरीता आपण मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटलो होतो. ते एनडीएचे सदस्य असताना देखील त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. आज त्यांच्या सत्काराला बाळासाहेबांचे पुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. हा योगायोग म्हणावा लागेल. असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी काही राजकीय भाष्य देखील केले. राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत बाळासाहेबांनी दोनदा पवारांचे ऐकले, तर मी का नाही ऐकणार असे म्हणत त्यांनी विरोधकांना चिमटा काढला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/