राष्ट्रवादी-शिवसेना ‘आघाडी’बाबत बाळासाहेबांनी 20 वर्षापूर्वी दिलं होतं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असताना देखील शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षात तेढ निर्माण झाली. त्यामुळे राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन न झाल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना आज (रविवार) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतिदिन आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 1999 मध्ये एका हिंदी न्युज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तुम्ही राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांच्याबद्दल परखड मत व्यक्त केले होती. याच मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते की, राजकारणात काही संभाव्यता असतात. तुम्ही शरद पवारांसोबत आघाडी करणार का ? यावर बाळासाहेबांनी म्हटले होते की संभाव्यता ? जर राजकारण बदमाश लोकांचा खेळ आहे असे म्हटले असते तर, तुम्ही बदमाश लोकांसोबत रहाणार की सज्जनांसोबत ? मी बदमाश लोकांसोबत नाही जाणार, दुष्ट लोकांसोबत आघाडी शक्य नाही. तसेच जो माणूस अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्याशी आम्ही हातमिळवणी कशी करू शकतो ? मी तर कधीच करु शकत नाही, असे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते.

शरद पवारांचा उल्लेख करत बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, जो माणूस सर्वांसमोर हे म्हणतो की सरकार पाडणं हे माझ कर्तव्य आहे आणि मी ते काम केलं. मला माहित आहे शरद पवार हे यामध्ये तरबेज आहेत. पण तुम्ही मतदारांविषयी विचार करा. ते कसे आमची आघाडी स्विकारतील, असा सवाल बाळासाहेबांनी उपस्थित केला होता. बाळासाहेबांची ही मुलाखत त्यावेळी प्रचंड गाजली होती. आज राज्यात भाजप-शिवसेनेत फुट पडली असून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमीळवणी केली. त्यातच आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन असून त्याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या या मुलाखतीनंतर शरद पवार आणि बाळासाहेब अनेक वेळा एकाच मंचावर आले होते. त्यानंतर 1995 मध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखालील सरकारला विधानसभेत पराभूत करून भाजपसोबत पहिल्यांदा राज्यात सरकार स्थापन केले होते. 1999 च्या निवडणुकीत शिवसेनेला सरकार स्थापन करण्यात अपयश आले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसने अपक्ष आमदरांचा पाठिंबा घेत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले होते.

Visit : Policenama.com