मी मुख्यमंत्री होईल असे वचन कधीही बाळासाहेबांना दिले नव्हते परंतु . .

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आजपर्यंत ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्यासोबत गेलो असलो तरी आजही माझे अंतःकरण भगवेच आहे आणि आमचा रंग देखील भगवाच आहे अशी गर्जना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईमधील बीकेसी येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री झाल्यानंतरच हा त्यांचा पहिलाच सत्कार समारंभ होता जो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवसेनेकडून वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मी स्वतः मुख्यमंत्री होईल असे कधीही बाळासाहेबांना वचन दिले नव्हते मात्र परिस्थितीमुळे तसा निर्णय घ्यावा लागला असे ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. तसेच मी कधीही भगवा खाली ठेवलेला नाही, ठेवणारही नाही. मी मुख्यमंत्री झालो ही वचन पूर्ती नसून त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे असे म्हणत पुढील मुख्यमंत्री हा शिवसैनिकच असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेनेने इतर पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केल्याने भाजपने सेनेवर अनेकदा टीका केली होती या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले ज्या वेळी तुम्ही २०१४ मध्ये अदृश्य हातांची मदत सत्ता स्थापनेसाठी घेतली होती तेव्हाच तुम्ही पूर्ण उघडे झाला होतात त्याच काय ? असा सवाल देखील ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

फेसबुक पेज लाईक करा –