‘समृद्धी’ महामार्ग नव्हे, बाळासाहेब ठाकरे महामार्ग !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फडणवीस सरकारने सुरु केलेला समृद्धी ,महामार्गाचा महत्वकांक्षी प्रकल्पाचे नाव बदलून आता बाळासाहेब ठाकरे महामार्ग असे ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. भाजप आणि शिवसेनेची युती असताना देखील शिवसेनेने ही मागणी केली होती परंतु त्यावेळी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी या मार्गाला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देणार असल्याचे सांगितले होते.

मात्र आता मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव मांडताच सर्वांनी त्यांला होकार दर्शवला आणि बाळासाहेब ठाकरे महामार्ग या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला. त्याचप्रमाणे या महामार्गासाठी ३ हजार ५०० कोटींचा अतिरिक्त निधी देखील देण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानंतर राज्यातील पहिला महामार्ग हा युती शासनात बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन गडकरींच्या साहाय्याने पूर्ण केला होता त्यामुळे या प्रकल्पासाठी बाळासाहेबांचे नाव निश्चित केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

भाजप आमदाराने केली होती डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्या नावाची मागणी

गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार आहेत. त्यांनी समृद्धी महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. आपल्या मागणीचे एक पत्र देखील गायवाड यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यामध्ये ते म्हणतात, समृद्धी महामार्ग हा मुंबई ते नागपूर असा आहे. नागपूरला बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक अनुयायांना बौद्ध धर्माची शिक्षा दिलेली आहे तसेच मुंबई दादर येथील चैत्यभूमी देखील बाबासाहेबांचे समाधीस्थळ आहे आणि ही दोनीही ठिकाणे बहुजन समाजासाठी श्रद्धेचे स्थान आहे यामुळे या ठिकाणी राज्यांतून देशांतून अनेक जण येत असतात. म्हणूनच या दोनीही स्थळांना जोडणाऱ्या महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी गायवाड यांनी केली होती.

फेसबुक पेज ला लाईक करा 👉: https://www.facebook.com/policenama/