काय सांगता ! होय, एकमेकांवर ‘कुरघोड्या’ करणारे थोरात-विखे पाटील एकाच सोफ्यावर, चर्चेला उधाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस पक्षात एकत्र काम करत असताना बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोन नेत्यांनी कायम एकमेकांवर कुरघोडीचे करण्याचे राजकारण केले. मात्र, आज राधकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये तर बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमध्ये आहेत. आजही हे दोन नेते एकमेकांवर आरोप करण्याची संधी सोडत नाहीत. अशातच हे दोघे एका कार्यक्रमात एकत्र आले आणि दोघे एकाच सोफ्यावर शेजारी बसले. त्यांना एकमेकांसोबत गप्पा मारताना पाहिल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या.

नेहमी एकमेकांविरोधात बोलणारे हे दोन दिग्गज नेते एका लग्न समारंभात एकाच सोफ्यावर शेजारी-शेजारी बसले. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका विवाह सोहळ्यासाठी हे नेते एकत्र आले होते आणि त्यांनी शेजारी बसून एकमेकांसोबत गप्पा मारल्या. ऐरवी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या दोन नेत्यांना एका लग्न सोहळ्यात एकत्र येऊन शेजारी बसण्याचा प्रसंग घडला. संगमनेर तालुक्यातील नामदेव गुंजाळ यांच्या मुलीच्या लग्नात हा प्रसंग घडला.

लग्न सोहळ्यासाठी दोन्ही नेते एकाच वेळी दाखल झाले. बाळासाहेब थोरात यांनी चक्क राधाकृष्ण विखे यांना शेजारी बसवून घेतले. लग्न समारंभात उपस्थित असताना दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे अनेकांनी पाहिले. मात्र, दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत उत्सुकता अजून कायम आहे. राजकारणात वैरी असणारे समोर आले तर मित्रत्वाच्या नात्याने भेटतात तसाच हा प्रसंग होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/