Balasaheb Thorat | बाळासाहेब थोरातांचा शिंदे गटाला मिश्किल टोमणा, माझं नाव वापरलं तर ‘रॉयल्टी’ द्यावी लागेल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माझं नाव आणि फोटो वापरणार असतील मला त्यांच्याकडून रॉयल्टी घ्यावी लागेल, असा मिश्किल टोमणा काँग्रेस नेते (Congress Leader) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी शिंदे गटाला लगावला आहे. निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ’बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव शिंदे गटाला (Shinde Group) दिले आहे. हे नाव दिल्यानंतर, बाळासाहेब म्हणजे नेमके कोणते? बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), बाळासाहेब दिग्रस (Balasaheb Digras) की बाळासाहेब आंबेडकर (Balasaheb Ambedkar) अशी टीका केली गेली. ते मुंबईत बोलत होते.

 

शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) असे नाव मिळाल्यानंतर नेमके कोणते बाळासाहेब अशी टीका केली जात आहे, तुमचेही नाव घेतले जात आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, माझा फोटो आणि नाव वापरलं तर रॉयल्टी (Royalty) घ्यावी लागेल. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

 

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत (Andheri East By-Election) माहिती देताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने ठाकरे गटाला (Thackeray Group) पाठिंबा दिला आहे. याबद्दल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray यांनी काँग्रेस नेत्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना फोन करुन आभार व्यक्त केले आहेत.

थोरात म्हणाले, बाळासाहेब थोरातांची शिवसेना असेल आणि माझा फोटो लावला तर रॉयल्टी घ्यावी लागेल.
ठीक आहे आता जे काय चालले आहे त्याचे आत्मपरिक्षण नागरिकांना करण्याची वेळ आली आहे.
लोकशाही आणि आपला देश कसा पुढे जातोय याचे परीक्षण करुन
निर्णय घेण्याची काळजी आता नागरिकांनी घ्यायची आहे.

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा