Balasaheb Thorat | रश्मी शुक्लांनी घेतली फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट, बाळासाहेब थोरात म्हणाले – ‘सागर बंगल्यात वॉशिंग मशीन…’

Balasaheb Thorat congress balasaheb thorat criticize ips rashmi shukla and devendra fadnavis meet DGP
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फोन टॅपिंग प्रकरणी (Phone Tapping Case) आज मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Session Court) सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण आले असताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी या भेटीवरुन टीका केली आहे. सागर बंगल्यात वॉशिंग मशीनच काम चालत असेल, अशा खोचक टोला बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) फडणवीसांना लगावला.

 

फोन टॅपिंग प्रकरणात ठाकरे सरकारच्या (Thackeray Govt) काळात चौकशी सुरु झाली होती. या फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा (FIR) नोंदवण्यात आला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या प्रकरणाचं पुढं काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी मंगळवारी रात्री ट्विट करत राष्ट्रवादीचा (NCP) बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे म्हटले होते. तर बुधवारी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी नेत्यांची संपत्ती, परदेशातील मालमत्ता आणि प्रेयसीच्या नावाने जमवलेला पैसा आदींचा गौप्यस्फोट करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. या सुनावणीच्या पाश्वभूमीवर रश्मी शुक्ला आणि मोहित कंबोज यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याने वेगवेगळी चर्चा सुरु झाली आहे.

 

बेकायदेशीर फोन टॅपिंगचा आरोप

रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अ‍ॅक्टनुसार (Telegraph Act) गुन्हा दाखल आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी याबाबत आरोप केले होते.

 

याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे (Former DGP Sanjay Pandey) यांची समिती नेमण्यात आली होती.
याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशावरुन रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Govt) स्थापन होण्याआधी फोन टॅपिंग करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दाखल केलेल्या या चार्जशीटमध्ये 20 शासकीय अधिकाऱ्यांसह शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

 

Web Title : –  Balasaheb Thorat | congress balasaheb thorat criticize ips rashmi shukla and devendra fadnavis meet DGP

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Total
0
Shares
Related Posts