Balasaheb Thorat | काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; काँग्रेसनेते बाळासाहेब थोरांत यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Balasaheb Thorat | विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांनंतर काँग्रेस (Congress) पक्षातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त सूत्रांकडून समजते. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निकालादिवशीच प्रचंड नाराजी व्यक्त करत त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे आपला विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सोपविल्याचे दिल्लीतील काँग्रेसच्या खात्रीलायक सूत्रांकडून समजते. आता यात काँग्रेस पक्षाच्या हायकमांडची पुढील रणनीती काय असणार? याची चर्चा रंगली आहे. बाळासाहेब थोरात यांचे मन वळविण्यात काँग्रेस हाय कमांड यशस्वी होणार का? याबाबतच्या चर्चेने देखील जोर धरला आहे.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी आपला विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपविल्यापासून केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाल्याचे देखील सूत्रांकडून समजते. पण बाळासाहेब थोरात हे आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. अशी देखील माहिती हाती येत आहे. तसेच, थोरात यांच्या राजीनाम्याच्या पत्रात थोरातांनी (Balasaheb Thorat ) आपण काँग्रेसच्याच विचारांनी आपण स्पष्ट केलं आहे.
नाशिक पदवीधर विधानसभा निवडणुकीत (Nashik Graduates Constituency) तांबे कुटुंबियांना काँग्रेस
प्रदेश कार्यकारिणीकडून खोटा एबी फॉर्म देण्यात आल्याचा दावा सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी
काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन केला होता.
तसेच यातून आम्हाला आणि बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्याचा डाव आखण्यात आला होता.
असा गंभीर आरोप त्यांनी राज्यतील काँग्रेस पक्षावर केला आहे.
त्यावर आजारी असलेल्या बाळासाहेब थोरातांनी एक व्हिडीओ जारी करत नाराजी व्यक्त केली होती.
तसेच आपण आपले म्हणणे काँग्रेस हायकमांडकडे पाठविले असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले होते.
त्यातच आता त्यांच्या विधीमंडळ पक्षनेते पदाच्या राजीनाम्याची बातमी समोर येत आहे.
त्यामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.
आणि यातून काँग्रेसचे अंतर्गत मतभेद देखील चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.
Web Title :- Balasaheb Thorat | congress leader balasaheb thorat resignation as legislature party leader source information
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Mouni Roy | ग्रे बिकिनीत अभिनेत्री मौनी रॉय दिसतेय एकदम हॉट; फोटो पाहून चाहते घायाळ