शरद पवार देशाचे नेते, त्यांना जपणं केंद्र सरकारचं काम, ‘या’ दिग्गज नेत्यानं सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून त्यावर आता संमिश्र प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. यावर आता काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की शरद पवार हे देशपातळीवरील नेते असून त्यांची सुरक्षा काढणं चुकीचे आहे. यावेळी ते पुण्यात अ‍ॅड. रावसाहेब शिंदे पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित होते त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. या कार्यक्रमात रघुनाथ माशेलकर, आमदार प्रशांत गडाख यांना सन्मानित करण्यात आले.

शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी देण्यात येणारी सुरक्षा कमी करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याची कोणतीही कल्पना पवारांना देण्यात आलेली नव्हती. आगामी दिल्ली निवडणूकीच्या व्यवस्थेत आवश्यक यंत्रणेच्या कारणास्तव सुरक्षा कमी केल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अजून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु सुरक्षा कमी केल्याने आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

त्यात आता काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी देखील आपली प्रतिक्रिया मांडली. पवार देशपातळीवरील नेते आहेत. देशातील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचे नाव असून त्यांना जपणं हे केंद्र सरकारचं काम आहे. त्यांची सुरक्षा काढून घेणं चुकीचं असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी थोरातांनी मांडलेले मुद्दे –
1) राज ठाकरे यांनी लोकसभेला त्यांची भाषण चांगली केली होती, मुद्दे यांचे मांडले होते.

2) त्यांनी लोकशाहीशी निगडित राहावं, घटनेशी निगडित राहावं, राजकारण तर होत राहतं.

3) भाजपचं केंद्रीय पातळीवरील काम पाहिलं तर भाजप लोकशाही ठेवणार का नाही हे वाटून जातं.

4) आपल्या मूलभूत तत्वांना धोका पोहचवण्याचे काम सुरु आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

 

You might also like