काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची निवड जवळपास निश्‍चितच !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील नेतृत्वात मोठा फेरबदल केला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर या रिक्त असलेल्या पदी बाळासाहेब थोरात यांना नेमण्यात आले आहे.

याशिवाय प्रदेशाध्यक्ष पदाबरोबरच चार कार्याध्यक्ष नेमण्यात येणार आहे. विश्वजीत कदम, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, बसवराज पाटील हे कार्याध्यक्ष असणार आहेत. नाना पटोले यांना प्रचार समितीचे अध्यक्षपद देणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या नियुक्त्या लवकर जाहीर करण्यात येणार आहेत.

काँग्रेसकडून कार्याध्यक्षाची निवड करताना प्रादेशिक संतुलन राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विश्वजीत कदम हे पश्चिम महाराष्ट्राचे नेते आहे. यशोमती ठाकूर आणि नितीन राऊत हे विदर्भातील नेते आहेत. तर बसवराज पाटील हे मराठवाड्यातील नेते आहेत.

लोकसभा निवडणूकीत राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला होता, राज्यातील काँग्रेसचा फक्त १ खासदार विजयी झाला होता. भाजपला आणि शिवसेनेला मात्र राज्यात मोठे यश मिळाले. परंतू राज्यातून काँग्रेस भूईसपाट झाले. राज्यातील पक्ष नेतृत्वात बदल होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु झाली होती. म्हणूनच राज्यात काँग्रेसकडून पुन्हा पक्ष बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच