Balasaheb Thorat | बाळासाहेब थोरातांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘सभेला ऐकण्यापुरती गर्दी होईल, मात्र मतात परिवर्तन नाही’

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या आजच्या सभेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातच आता या सभेवरून राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका (Criticism) केली आहे. सभेला गर्दी होईल मात्र ती ऐकण्यापुरतीच त्याचे मतात परिवर्तन होणार नाही. विकासाचे राजकारण असले पाहिजे. धर्म व्यक्तिगत असला पाहिजे. राज्यात सभेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देणार नाही. मात्र जे ही सभा घेत आहेत त्या नेत्यांचीही तितकीच जबाबदारी आहे असे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.

 

संगमनेर तालुक्यातील (Sangamner Taluka) खांबे या दुर्गम भागातील शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Din) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या हस्ते ध्वजारोहण (Flag Hoisting) करण्यात आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रत्येकाला मते मांडण्याचे राज्यघटनेने (Constitution) अधिकार दिले आहेत. मात्र काही मंडळी सवंग राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जाती – धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्म हा व्यक्तिगत असला पाहिजे तर राजकारण विकासाचे असले पाहिजे. काही जणांकडून जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु राज्यातील जनता सुज्ञ आहे. सभा ऐकण्यासाठी गर्दी होईल मात्र त्याचे मतात परिवर्तन होणार नाही, असेही ते म्हणाले.

मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला (State Government) 3 तारखेचा वेळ दिला आहे.
त्यानंतर राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) टीकेची झोड उठवली.
त्यामुळे आज औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची जी सभा होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले. शनिवारी मनसैनिकांनी राज ठाकरे यांचे जंगी स्वागत केले होते.

 

Web Title :- Balasaheb Thorat | minister balasaheb thorat criticism on mns chief raj thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा