भविष्यात ‘अशा’ गोष्टी खपवून घेणार नाही, बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना ‘इशारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधींबद्दल केलेल्या विधानानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. संजय राऊतांनी आपले विधान मागे घेतल्यानंतर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, त्यांचे ते विधान तर चूकीचेच होते, त्यांच्या त्या विधानाने आम्ही तर नाराज आहोतच आणि पुढे असे काही विधान सहन करणार नाही.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, आमची नाराजी आम्ही उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवली होती आणि भविष्यात अशी विधानं आम्ही सहन करणार नाही. कोणताही महापुरुष असेल, सर्वांनी याबाबत काळजी घेतली पाहिजे की त्यांच्याकडून अशी विधाने येणार नाहीत.

बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊतांच्या विधानावर नाराजी व्यक्त करताना सांगितले की, त्यांचे ते विधान तर चूकीचेच होते, त्यामुळे आता त्यांनी ते मागे घेतले, त्यांच्या त्या विधानाने आम्ही तर नाराज आहोतच आणि पुढे असे काही विधान सहन करणार नाही.

विरोधकांकडून सध्या टीका होत आहे की, काँग्रेस आणि अंडरवर्ल्डमधील संबंधाचा तपास व्हावा. यावर बोलताना थोरातांनी सवाल केला की जे विधानच चुकीचे होते त्याच्या तपासाची काय गरज आहे ?

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/