बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार ! मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा : एकनाथ शिंदे

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. यावेळी न्यायालयाने उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपत विधी व्हावा आणि येत्या २४ तासामध्ये म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी व्हावी असे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

ttps://twitter.com/ani_digital/status/1199197719694172161

न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी तीनही न्यायमूर्तींची आभार मानले आहेत तसेच आज ऐतिहासिक दिवस आहे म्हणूनच सत्याचा विजय झाला आहे असे देखील शिंदे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा कारण लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्व आहे त्यामुळेच बहुमताच्या सरकारला संधी दिली पाहिजे असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

१६२ नाहीतर १७० आमदार महाविकास आघाडीसोबत आहेत त्यामुळे आता कोणीही कोणाला फोडू शकणार नाही आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचा विश्वास देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

काय दिला सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. यावेळी न्यायालयाने उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपत विधी व्हावा आणि येत्या २४ तासामध्ये म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी व्हावी असे आदेश दिले आहेत.
उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी करा आणि त्यानंतर लगेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी करावी असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. तसेच बहुमत चाचणी दरम्यान मतदान हे गुप्त पद्धतीने होणार नाही तर याबाबत लाईव्ह टेलिकास्ट व्हावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Visit : Policenama.com