सावधान ! टक्कल असलेल्या पुरुषांना ‘कोरोना’चा सर्वात जास्त धोका, नव्या रिसर्चमध्ये समोर आली माहिती

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना विषाणूची बाधा वेगवेगळा आजार असणार्‍यांना होत असल्याचे निष्पन्न झाले होते. आता मात्र, टक्कल असलेल्या पुरुषांना इतरांपेक्षा कोरोनाव्हायरस संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, असा दावा एका रिसर्चमध्ये करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीत केलेल्या अभ्यासाचे प्रमुख संशोधक प्रोफेसर कार्लोस वॅम्बीयर यांच्या म्हणण्यानुसार, पुरुषांमधील टक्कल हे कोरोनाच्या गंभीर संसर्गासाठी धोकादायक घटक आहे. जानेवारीत चीनच्या वुहानमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अशा प्रकारच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांपेक्षा जास्त आहे. कोरोना विषाणू आणि टक्कल पडण्यातील संबंध समजून घेण्यासाठी दोन अभ्यास करण्यात आले आहे. स्पेनमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, 41 कोरोना रूग्णांवरील संशोधनात असे दिसून आले आहे की त्यापैकी 71 टक्क्यांहून अधिक पुरुषांना टक्कल होते.

ब्राउन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, 122 कोरोना रूग्णांवर संशोधन केले गेले होते, त्यातील 79 टक्के रुग्णांना टक्कल असल्याचे दिसून आले आहे. संशोधकांच्या मते टक्कल पडणे आणि कोरोनाचा संसर्ग यांच्यात एक विशेष संबंध आहे. पुरुषांच्या सेक्स हार्मोन एंड्रोजनमुळे कोरोना विषाणूची लागण होण्याची क्षमता वाढू शकते. अशा हार्मोनमुळे पुरुषांमध्ये औषधांचा प्रभाव कमी होत आहे आणि रुग्ण गंभीर आजारी पडतात, असा दावाही करण्यात आला आहे.