PHOTO : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघातात पोलिस उपायुक्‍त (DCP) जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या बलेनो कारचे स्टिअरिंग अडकल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघात झाला. तर त्यात सोलापूर शहर विभागाचे पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड जखमी झाले आहेत. तर त्यांचा चालकही जखमी झाला आहे. अपघातानंतर देहू रोड पोलिसांनी धाव घेतली आहे.

accident

सोलापूरचे पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड हे मुंबईहून पुण्याकडे त्यांच्या बलेनो गाडीतून येत होते. त्यावेळी सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर त्यांच्या कारचे स्टिअरिंग अडकल्याने एका वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला जाऊन धडकली. त्यात मधुकर गायकवाड हे किरकोळ जखमी झाले आहेत. तर त्यांच्या चालकालाही मार लागला आहे. कारमध्ये किती जण होते. ते अद्याप समजू शकले नाही. तर ते मुंबईहून पुण्याकडे जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. देहुरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. तर अपघातात कारच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे.

Accident